शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लघु सिंचन प्रकल्प वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:18 IST

पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही.

ठळक मुद्देतीन गोदामांवर अतिक्रमण : विटभट्ट्यांमुळे तलावाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही. असाच प्रकार सिंचन विभागातील योजनांबाबत घडत असल्याने लघु प्रकल्पांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या वर्धा शहरालगतच्या तथा आर्वी लघु पाटबंधारे उपविभागांतर्गत येणाºया रोठा तलावाकडे कानाडोळा केला जात असल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, तेथील गोदामांवर अतिक्रमण झाले असून विटभट्ट्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १९ लघु प्रकल्प आहेत. सिंचन क्षमता वाढावी, शेतकºयांना पाणी म्ळिावे, भूगर्भातील जलपातळी वाढावी म्हणून या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण या तलावांकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचेच दिसते. केवळ नोंदी घेण्यापूरतेच हे तलाव राहिले आहेत. पावसाळ्यात तलावाने जलपातळी न गाठल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण कारणांचा शोध घेण्याचे सौजन्य लघु पाटबंधारे विभाग दाखवित नाही. वर्धा लगत रोठा वन आणि रोठा टू हे दोन तलाव आहेत. या तलावांची निर्मिती २५ ते ३० वर्षांपूर्वी करण्यात आली. यातील रोठा वनची माहिती देणारे फलकही त्या भागात अस्तित्वात नाहीत. रोठा टू या तलावासाठी १८९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे फलकावर नमूद आहे. १६२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करता येईल, एवढी क्षमता या तलावाची असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील खरीप हंगामात ७७ हेक्टर तर रबी हंगामात ८५ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे सिंचन होत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.या तलावाच्या बुडित क्षेत्रातील सर्व अतिक्रमण हटविण्यात आल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते; पण प्रत्यक्षात या परिसरात मोठे अतिक्रमण असल्याचे पाहावयास मिळते. रोठा वन व टु च्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. या परिसरात सुमारे दोन हजार चौरस फुटामध्ये तीन गोदामांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्वी या गोदामांमध्ये सिमेंट ठेवले जात होते. या गोदामावर सध्या परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. गोदामांमध्ये जनावरे बांधली जात असून खत, शेतीपयोगी साहित्य ठेवले जात असल्याचे दिसून आले. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता गोदामांचे दोन हजार रुपये मासिक भाडे दिले जात असल्याचे सांगण्यात आले. भाडे वसुलीकरिता संबंधित विभागाचा एक व्यक्ती येत असल्याचेही परिसरातील नागरिक सांगतात. शिवाय तलाव परिसरातच विटभट्ट्या आहेत. काही भट्टीधारक तलाव परिसरातील माती चोरत असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.घटनांकडे लघु पाटबंधारे तथा पोलिसांचे दुर्लक्षरोठा वन व टू या दोन तलावांच्या परिसरात आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. हत्यांपासून तर आत्महत्यांसारख्या घटना घडत असताना तेथील व्यवस्थेकडे लक्ष दिले जात नाही. प्रेमी युगूल या भागात सर्रास हुंदडताना दिसत असून त्यांना हटकण्याकरिता कुणी राहत नाही. शिवाय ओल्या पार्ट्यांसाठीही या भागाचा गैरवापर केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे तलावांची तथा पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.