शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातील साहित्य रस्त्यावर

By admin | Updated: April 9, 2017 00:24 IST

येथील गजबजलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. रस्त्यालगतच्या

वाहतुकीला अडथळा : रस्त्यावर वाहन थांबवून प्रवाशांची ने-आण सेलू : येथील गजबजलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. रस्त्यालगतच्या दुकानदारांनी रस्त्याच्या काठापर्यंत दुकाने थाटली आहे. यात काही दुकानदार दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. तर वाहन चालकही भर रस्त्यात वाहन उभे ठेवून प्रवासी ने-आण करतात. त्यामुळे वाहतुकीचा पचका झाला असून ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे. भाजी मार्केटचा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर देखील हाच प्रकार पाहायला मिळतो. यात दुकानासमोर ग्राहकांचे वाहन ठेवले जाते. त्यात भरीसभर म्हणून आॅटो व चारचाकी वाहने रस्त्यालगत थांबविले जातात. त्यामुळे या रस्त्याने आवागमन करायला जागा शिल्लक नसते. येथील मेडिकल चौक तर अपघात प्रवण स्थळ बनले आहे. येथे कुणीही आपल्या मर्जीने दुकान थाटून साहित्य रस्त्यावर मांडताना दिसतो. पोलिसांच्या निवास स्थानासमोर देखील फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांनी दुकान मांडले आहे. या विक्रेत्यांना प्रशासनाकडून जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे ठरत आहे. यापुर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार संजय बोठे यांच्यासमोर उपस्थित सदस्यांनी ही बाब गांभिर्याने मांडली. यावर ठाणेदारांनी आठ दिवसात कारवाई करतो असे सांगितले होते. मात्र अजूनही येथील अतिक्रमण कायम आहे. याच मार्गावरुन बसस्थानकावर बसगाड्या जातात. त्यामुळे बसचालक व अन्यवाहन चालकांना कमालीचा त्रास होतो. यातही काही रस्ते नगरपंचायतीच्या तर काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र अतिक्रमणाविषयी कडक भूमिका घेण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारत पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी) बसस्थानक परिसरात होते वाहतुकीची कोंडी बसस्थानक चौकात रस्त्यापर्यंत दुकाने थाटुन अतिक्रमण करण्यात आले आहे. बसस्थानकाच्या समोरुन वडगाव कडे जाणारा रस्ता आहे. या टी पाँईटवर वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. सेलू शहरातील सर्वच मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असताना नगरपंचायत प्रशासन मात्र याविरोधात कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांत प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यावर अतिक्रमण करुनही काही दुकानदारांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर आणून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे.