शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खाली करण्याची मजुरी खरेदीदारांनी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:20 IST

कापूस विक्रीकरिता आणल्यावर बाजार समितीत वाहनातील कापूस खाली करण्याची मजुरी नियमबाह्यरित्या शेतकºयांकडून वसूल केल्या जाते.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : शेतकºयांवर भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कापूस विक्रीकरिता आणल्यावर बाजार समितीत वाहनातील कापूस खाली करण्याची मजुरी नियमबाह्यरित्या शेतकºयांकडून वसूल केल्या जाते. ही मजुरी नियमानुसार व्यापाºयांनी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी स्वीकारले.पणन महामंडळाचे संचालक यांनी ३१ मार्च २०१० ला राज्यातील बाजार समित्यांकरीता आदर्श उपविधी तयार केली. ती सर्व बाजार समित्यांनी स्वीकृत केली. या नवीन आदर्श उपविधी राज्यातील सर्वच बाजार समित्यांनी स्वीकृत केल्या आहे. स्वीकृत केलेल्या नवीन आदर्श उपविधीत १ ते ६० मधील अनुक्रमांक २८(अ) मध्ये शेतमाल वजनावर लावण्यापासूनचे दर हे खरेदीदाराने द्यावयाचे आहेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. परंतु संपूर्ण राज्यात कापूस या शेतमालाचे परिमान हे वजनावर असून वजनासाठी लावल्यावर वाहनातील कापूस खाली करण्याची मजूरी ही शेतकºयांकडून वसूल केल्या जात आहे. हिंगणघाट बाजार समितीने शेतकरी हिताचा विचार करून कापूस गाडी खाली करण्याचा नियमबाह्य खचार्तून शेतकºयांची त्वरित मुक्तता करावी. उपविधीतील २८(अ) च्या तरतूदीनुसार वजनावर लावल्यानंतर कापूस गाडी खाली करण्याची मजुरी ही खरेदीदारांनी द्यावी असे निर्देशित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. राज्यात हिंगणघाट बाजार समितीत शेतकरी हिताच्या योजना राबविण्यात येतात असा लौकिक आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रा.मधुकर झोटींग, मधुसूदन हरणे, बाबा दिवानजी, दिलीप लाखेकर, मनोज पुसदेकर, सुधाकर अगडे, अजाब राऊत, वाघमारे आदींनी केली.मजुरीदाखल साडेतीन कोटींची लूटहिंगणघाट बाजार समिती आवारात कापसाची आवक मागील दोन हंगामात ३५ लक्ष क्विंटल आहे. यानुसार कापूस खाली करण्याचा मजूरी दर १० रुपये क्विंटल याप्रमाणे ३ कोटी ५० लक्ष रुपये शेतकºयांकडून नियमबाह्यरित्या वसूल करण्यात आले, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. शेतकºयांची नियमबाह्य खचार्तून मुक्तता करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.