शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सच्या धडकेत मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:53 IST

मंदिरातून येत असलेल्या मुलीला भरधाव ट्रॅव्हल्सने तिच्या घरासमोरच चिरडल्याने मुलगी जागीच ठार झाली. हा अपघात नागपूर-यवतमाळ मार्गावरील शिरपूर (होरे) येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देगावकरी संतप्त : वाहनांची तोडफोड; वाहतुकीचा खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी/विजयगोपाल : मंदिरातून येत असलेल्या मुलीला भरधाव ट्रॅव्हल्सने तिच्या घरासमोरच चिरडल्याने मुलगी जागीच ठार झाली. हा अपघात नागपूर-यवतमाळ मार्गावरील शिरपूर (होरे) येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडला. या अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. बिट्टु गजानन राजुरकर (११) रा. शिरपूर (होरे), असे मृतक मुलीचे नाव आहे.या घटनेने संतप्त झालेल्या येथील नागरिकांनी अपघातास कारण ठरलेल्या ट्रॅव्हल्सची तोडफोड केली. मृतदेह रस्त्यावर ठेवत वाहतूक रोखून धरली. यामुळे सुमारे तीन ते चार तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या परिसरात यापूर्वीही अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे येथे गतिरोधक लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. शिवाय जोपर्यंत गतिरोधक लागणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांचा रोष पाहून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.पोलीस सुत्रानुसार, बिट्टू राजुरकर ही सकाळी घरासमोरच असलेल्या मंदिरात काकडा आरतीसाठी गेली होती. काकडा आरतीचा कार्यक्रम आटोपून ती घरी पेन आणण्याकरिता जात असताना रस्ता ओलांडताना यवतमाळकडून भरधाव येणाºया एमएच ४० एटी ७०७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने तिला जबर धडक दिली. यात ती ट्रॅव्हल्सखाली चिरडल्या जावून जागीच ठार झाली. दरम्यान, ट्रॅव्हल्स चालकाने पळ काढला. सदर ट्रॅॅव्हल्सला भिडी येथे लोकांनी अडवून चालकाला चांगलाच चोप देत देवळी पोलिसांच्या स्वाधीन केले.या मार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आज झालेल्या भिषण अपघातामुळे शिरपूर येथील गावकºयांनी रस्त्यावर बसून महामार्ग चार तास रोखून धरत संतप्त भावना व्यक्त केल्या.वाहनाच्या धडकेत युवक ठारसिंदी (रेल्वे) - रस्ता ओलांडण्याकरिता उभ्या असलेल्या युवकाला भरधाव वाहनाने धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कांढळी येथे शनिवारी सकाळी घडली. प्रवीण जुमडे, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.पोलीस सुत्रानुसार, सिंदी (रेल्वे) येथील प्रवीण जुमडे हा जाम येथील पी.व्ही. टेक्सटाईल्समध्ये कामाकरिता जात होता. दरम्यान कांढळी येथे रस्ता ओलांडताना त्याला एमएच ३३ - ०५६० क्रमांकाच्या वाहनाने धडक दिली. यात प्रवीण याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती प्रवीणचे वडील जनार्धन यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सदर वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.खासदारांचा रस्त्यावर ठिय्याघटेची माहिती मिळताच खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठत नागरिकांशी चर्चा केली. गतिरोधकाची मागणी पूर्ण करण्याकरिता स्वत: शिरपूर मार्गावर बसून जोपर्यंत गतिरोधक लावत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. याची दखल घेत महामार्गावर शिरपूर बसस्थानकानजीक चार गतिरोधक लावण्यात आलेत. त्यानंतरच महामार्गावरची वाहतूक सुरू झाली.यापूर्वी गेले तीन जीवराजूरकर यांच्याच बाजूला असलेले राधाबाई दत्तुजी भोयर यांचाही येथेच झालेल्या अपघातात मृत्यू झाला. शालीक वाटकर यांचा मुलगाही त्याच ठिकाणी अपघातात ठार झाला. आज बिट्टू राजूरकर हिचा बळी गेला. या तीनही जणांची घरे एकमेकाला लागून आहेत. यामुळे आज शिरपूरची जनता रस्त्यावर उतरली. येथे आधीच स्पीड ब्रेकर लावले असते तर त्या मुलीचा जीव वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.