शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘जवाद’चा झटका; उभ्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बंगालची खाडी तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. शिवाय ‘जवाद’ चक्रीवादळ आध्र प्रदेशातील किनारपट्टीवर धडकल्याने विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकूणच जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. परंतु, थोड्या अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे कापणी पश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन भिजल्याने सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

कुटारही भिजले- जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाची जोड दिली आहे. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मालकीचे सोयाबीनचे कुटार पावसामुळे भिजल्याने त्यांना सध्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर केला जात असल्याने जनावरांसाठी हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले असल्याचे वृद्ध शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

आपण यंदा १५ एकर शेतजमिनीत सोयाबीनची लागवड केली. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे कापणीपश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन पूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे.- सुभाष घायवट, सोयाबीन उत्पादक, पढेगाव.

पूर्वीच कापूस वेचणीसाठी मजूर सहज मिळत नाही. गावाबाहेरून मजूर आणून शेतीची कामे करावी लागत आहेत. अशातच शनिवारी परिसरात झालेल्या पावसामुळे झाडाला लागलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळून दिली पाहिजे.- नरेश झोड, कापूस उत्पादक, चिकणी.

उन्हाळ्यात जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निकाली निघावा म्हणून आपण सोयाबीनच्या मळणीनंतर शेतात सोयाबीनचे कुटार ढीग करून ठेवले होते. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण कुटार भिजले. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. शिवाय उन्हाळ्यात जनावरांसाठीचे वैरण बाजारातूनच खरेदी करावे लागणार आहे. हिरवा चाराही सध्या सहज मिळत नाहीच.- किशोर लुंगे, सोयाबीन उत्पादक, जामणी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती