शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शोभायात्रेने शिवरायांना मानाचा मुजरा

By admin | Updated: February 20, 2016 02:55 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

शिवाजी चौकात विविध कार्यक्रम : सकाळपासून शहरात रॅली व मिरवणुकावर्धा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वर्धेत सकाळपासून शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानाचा मुजरा देण्याकरिता वर्धेकरांची सकाळपासूनच गर्दी बघायला मिळाली. या चौकाला भगव्या पतकांनी सजविले होते. दिवसभर शहरातून निघालेल्या मिरवणुका त्यातच डोक्याला भगवे फेटे बांधून दुचारीवर निघालेली महिलांची व पुरुषांची मिरवणूक लक्षवेधत होते. जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी शिवाजी महाजांच्या पुतळ्याला पुष्पमाला घालून अभिवादन केले. शहरातील विविध संघटनांच्यावतीने महाराजांना अभिवादन करण्यात आले. पुष्पहारांचा वर्षाव करण्यात आला. ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या जयघोषांनी वर्धानगरी दुमदुमली.रामनगरातील युवा चौकातून परिसरातून युवा सोशल फोरम व विविध संघटनांच्यावतीने सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सिंहासनावरुन विराजमान शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पुढे ढोल-ताशांचा गरज करीत निघालेले ढोल-ताशा पथक त्यांनतर समाजातील विविध पैलूवर संदेश देणारे देखावे हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. ही मिरवणूक बघण्याकरिता रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झालेली होती. रात्री उशिरा ही मिरवणूक शिवाजी चौकात पोहचली. यानंतर शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवाजी चौक परिसर भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. शहरातील विविध भागांतून भगव्या पताका घेवून युवक युवतींच्या अनेक मिरवणुका निघाल्या. संभाजी ब्रिगेड, क्षत्रिय मराठा महासंघ, युवा ब्रिगेड, छावा संघटना यासह विविध संघटनेच्यावतीने शिवरायांना अभिवादन केले.शहरातील मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पुतळ्याजवळ वाहतुकीची कुठलीही कोंडी होणार नाही, याकरिता पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त होता.