शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

‘शिवशाही’ अप्रशिक्षित चालकांच्या हाती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

बहुतांशवेळी या गाड्यांवर अप्रशिक्षित चालक दिले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. किरकोळ अपघातांमुळे चारपैकी तीन शिवशाही गाड्यांचे सुट्या भागांच्या रूपाने लाखोंचे नुकसान होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गाड्यांवर होणाºया दुरुस्तीच्या खर्चामुळे शासनालाच आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र, याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या जीविताशी खेळ : गाड्यांचे लाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लांब पल्ल्यावरील फेरीकरिता वातानुकूलित शिवशाहीवर चक्क अप्रशिक्षित चालकांना पाठविले जात असल्याने एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा आगाराने प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालविल्याचा प्रकार उजेडात आला आहे.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत), पुलगाव हे आगार आहेत. संपूर्ण विभागात २६६ बसगाड्या आहेत. या गाड्यांत नोव्हेंबर महिन्यात चार वातानुकूलित, अत्याधुनिक शिवशाही बसगाड्यांची भर पडली. महिनाभरापूर्वी आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅगरची सुविधा, ड्रायव्हर अ‍ॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन या सोबतच दिल्लीत घडलेल्या निर्भया घटनेपासून पॅनिक बटणचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात विभागातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम (व्हीटीएस) ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या आणि कुठेही प्रत्येक बसगाडीचे ठिकाण कळणार आहे.प्रवाशांच्या सेवेत नव्याने आलेल्या शिवशाही बसेस रुजू करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत वर्धा-शिर्डी आणि वर्धा-शेगाव अशा या गाड्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवाशांचीही या गाड्यांना पसंती आहे. सोई-सुविधांमुळे महामंडळ हायटेक होत असले तरी चालकांना चांगले प्रशिक्षण देण्यात महामंडळ उदासीन दिसत आहे.बहुतांशवेळी या गाड्यांवर अप्रशिक्षित चालक दिले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. किरकोळ अपघातांमुळे चारपैकी तीन शिवशाही गाड्यांचे सुट्या भागांच्या रूपाने लाखोंचे नुकसान होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गाड्यांवर होणाºया दुरुस्तीच्या खर्चामुळे शासनालाच आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र, याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात मोठी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवशाही गाड्यांवर अप्रशिक्षित चालक देऊ नये, अशी मागणी होत आहे.प्रवाशांत भीतीचे वातावरणशिवशाही ही बसगाडी अत्याधुनिक आणि पूर्णत: इलेक्ट्रॉनिक आहे. या गाडीवर पाठविण्यापूर्वी चालकाला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मात्र, महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहेत.साध्या बसगाड्यांवरील चालकांना शिवशाहीवर पाठविले जात असल्याने प्रवाशांतही चिंता व्यक्त होत आहे. विभाग नियंत्रकांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाही