शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने ताणली ‘प्रत्यंचा’

By admin | Updated: January 22, 2017 00:26 IST

शिवसेना-भाजप युतीचा चेंडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे.

दीपक सावंत : सर्व ५२ जागांसाठी ९७ इच्छुकांच्या मुलाखती वर्धा : शिवसेना-भाजप युतीचा चेंडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे. युती होईल तेव्हा होईल; पण वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने सर्व ५२ जागाही लढण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग देत धनुष्याची प्रत्यंचा ताणली आहे. शिवसेनेचे नेते आरोग्य राज्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी वर्धेत जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ आणि पंचायत समितीच्या सर्व १०४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जिल्हा परिषदेसाठी ९७ जण या मुलाखतींना सामोरे गेले तर पंचायत समितीसाठी तब्बल ३०० जणांनी मुलाखती दिल्याची माहिती ना. सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. इच्छुकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा चांगला असल्यामुळे पक्षाला जिल्ह्यात चांगलेच यश येईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेना उमेदवारांची घोषणा २५ जानेवारीला करण्यात येणार असल्याची माहितीही ना. सावंत यांनी याप्रसंगी दिली. शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना ना. सावंत म्हणाले, युती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युती झाल्यास पक्षादेश पाळला जाईल. शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. वर्धा जिल्ह्यात ९० टक्केपेक्षा अधिक जागा शिवसेना लढणार, हे आधीच ठरले होते. पूर्ण जागा लढण्याच्या दिशेनेही तयारी सुरू आहे; पण ९० टक्केपेक्षा अधिक जागा हमखास लढणार असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे वर्धा जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख निलेश देशमुख व वर्धा तालुकाप्रमुख राजेश सराफ उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी) निवडणूक हे राजकीय युद्ध शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी सरकारमध्ये झालेल्या चांगल्या निर्णयाबाबत शिवसेना सोबत राहिली आहे; पण जे निर्णय जनतेच्या दृष्टीने बरोबर नाहीत, अशा मुद्यांवर शिवसेना विरोधाची भूमिका घेत आली आहे. निवडणुकीत युती न झाल्यास निवडणूक राजकीय युद्धाप्रमाणे लढली जाईल, असेही ना. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले. २५ जानेवारीला होणार उमेदवारांची घोषणा शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा येत्या २५ जानेवारीला करणार आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच जागांवर सेना आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. ९० टक्केपेक्षा अधिक जागा लढण्याची तयारी पूर्णत्वास गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.