शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी शिवसेना दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:56 IST

शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत.

ठळक मुद्दे सरकारला शह देण्यासाठी शेतकऱ्यांना हात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात मागील वर्षी तूर विक्री करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. यावर्षीही शासनाने अनेक जाचक अटी तूर खरेदीच्याबाबत लादलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत. ते शेतकऱ्यांना यासाठी मदत करणार आहे.विदर्भात अनेक जिल्ह्यात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाले. व कापूस वेचाईचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. याचा थेट परिणाम तूरीच्या उत्पादनावर ही झाला आहे. तूर उत्पादन समाधानकारक झाले नाही. शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीचे केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आॅनलाईन नोंदणी करीत नसल्याने केंद्रावर आल्यावर त्याच्या अडचणी वाढतात. अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने आर्वी भागात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांची नियुक्ती केली आहे. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरू करण्यात आली आहे. येथे गेल्यावर्षी ६० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली यावेळीही शेतकऱ्यांची संपूर्ण तूर वेळेतच खरेदी केली गेली पाहिजे यासाठी शिवसेनेने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. कारंजा, आष्टी, आर्वी बाजार समितीत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. व शेतकऱ्यांच्या अडचणी तेथे सोडविण्यात येत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाला शह देण्यासोबतच शिवसेना शेतकऱ्यांसोबत कायम स्वरूपी उभी हे दाखविण्यात शिवसेनेचा प्रयत्न आहे. ८० टक्के समाजकारण या धोरणानुसार सदर कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही हिंगणघाट तालुक्यात कर्जमाफीच्या संदर्भात मदत केंद्र सुरू करण्यात आले होते.आर्वी विधानसभा मतदार संघात आष्टी, कारंजा, आर्वी बाजार समितीअंतर्गत आर्वी आणि कारंजा येथे शिवसेनेने मदत केंद्र सुरू केले आहे. आपण स्वत: व शिवसेनेचे तालुका संघटक, उप तालुका संघटक व तालुका प्रमुख शेतकऱ्यांना या कामासाठी मदत करीत आहो.निलेश देशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती