शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

पिंपळा पुनर्वसन येथील जवान शेखर बाळस्कर बेपत्ता

By admin | Updated: June 2, 2016 00:33 IST

पुलगाव येथील दारूगोठा भांडारात झालेल्या बॉम्बस्फोटात तालुक्यातील पिंपळा पुनर्वसन येथील शेखर गंगाधर बाळस्कर शहीद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शहीद झाल्याची भीती : ओळख पटविण्याचे प्रयत्नसुरेंद्र डाफ आर्वी)पुलगाव येथील दारूगोठा भांडारात झालेल्या बॉम्बस्फोटात तालुक्यातील पिंपळा पुनर्वसन येथील शेखर गंगाधर बाळस्कर शहीद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.पुलगाव दारुगोळा भांडारात झालेल्या घटनेच्यावेळी कर्तव्यावर होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. स्फोटात तो शहीद झाल्याचा दाट संशय आहे. मात्र काही मृतदेहांची स्थिती बिकट असल्यामुळे शेखरची ओळख पटलेली नाही. पुलगाव दारूगोळा भांडार प्रशासनाने काही मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शेखरचे वडील व लहान भाऊ सेवाग्राम येथे गेले होते. तिथे शेखरच्या वडिलांचा डीएनए शेखरच्या मृतदेहाशी जुळवून पाहणार आहे. या घटनेने ९०० लोकवस्ती असलेल्या पिंपळा पुनर्वसन येथील वातावरण शोकाकूल आहे.शेखरचा परिचयशेखरचे पूर्ण नाव शेखर गंगाधर बाळस्कर असून तो आर्वी तालुक्यातील पिंपळा पुनर्वसन येथील रहिवासी आहे. तो पुलगाव येथील डेपोत १३ महिन्यांपूर्वी फायरमन या अग्निशमन दलात नोकरीवर रूजू झाला. त्याचे वय २७ वर्षाचे असून तो अविवाहित आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याचे वडील मजूरीचे काम करतात. एक लहान भाऊ गोविंदा बाळस्कर हा सिंचन विभाग यवतमाळ येथे कार्यरत आहे. दुसरा लहान भाऊ अरविंद वर्धा येथे बी.ई.चे शिक्षण घेत आहे.तो या स्फोटात शहीद झाल्याची वार्ता पिंपळा पुनर्वसन गावात आहे. मात्र हा मृतदेह माझ्या भावाचा नाही, असे त्याच्या लहान भावाने म्हटल्याने व मृतदेह ओहख पटण्याजोगा नसल्याने वडीलांच्या डी.एन.ए. टेस्टवरून तो मृतदेह शेखरचा आहे याची खात्री करणार आहे. यासाठी शेखरचा मृतदेह सेवाग्राम येथे नेण्यात आला आहे. ओळख पटल्यावर याची खात्री होणार असल्याची माहिती आहे.