शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

‘ती’ मुख्याध्यापिका रजेवर

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील मुख्याध्यापिका शाळेतील पोषण आहाराचे साहित्य चोरून नेत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी तिला काही साहित्यासह ...

बयान रखडले : पोषण आहाराची चोरी प्रकरण समुद्रपूर : तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील मुख्याध्यापिका शाळेतील पोषण आहाराचे साहित्य चोरून नेत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी तिला काही साहित्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर हजर केले होते. या प्रकरणी शनिवारी सदर मुख्याध्यापिकेचे बयान नोंदविण्यात येणार होते; पण ती शिक्षिका रजेचर गेल्याने बयान नोंदविता आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.शुक्रवारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला वरघणे यांना पोषण आहारातील चना व तेल घरी नेत असताना शिक्षण समिती व गावकरी यांनी रंगेहाथ पकडल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी नासीर अहेमद व त्यांची चमू चौकशी करण्याकरिता शाळेत गेले होते. यावेळी सदरहू मुख्याध्यापिका रजेचा अर्ज टाकून सुटीवर गेली. त्यामुळे तिचे बयान नोंदविता आले नाही. त्यामुळे चौकशी अधिकारी परत आले. अधिक माहिती घेतली असता पोषण आहारात शासनाने तीन महिन्यापासून चना देणे बंद केले. आता चवळी देणे सुरू केले आहे. हा चना गेल्या तीन महिन्यापूर्वीचा विद्यार्थ्यांना न देता वाचवून नेण्याचा प्रकार असावा असा कयास आहे. या प्रकरणात अधिकारी मुख्यध्यापिकेला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावात आहे.(तालुका प्रतिनिधी) स्टॉक रजिस्टर प्रमाणे रेकॉर्ड बरोबर आहे. मुख्याध्यापिका आज सुटीवर असल्याने त्यांचे बयाण घेण्यात आलेले नाही. सुटीवरून परत आल्यानंतर त्यांचे बयाण नोंदवून वरिष्ठांना अहवाल सादर करू.-नासीर अहमद, गट शिक्षणाधिकारी, पं. स. समुद्रपूर.