लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार १८ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे येणार आहेत. यावेळी ते कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे.१७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता शरद पवार यांचे वर्धा येथे आगमन होणार आहे. रात्री ९ ते १०.३० या वेळेत ते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. यानंतर १८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता माजी आमदार वसंतराव कार्लेकर यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. यानंतर सकाळी १० वाजता यमुना लॉन वर्धा येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी दिली आहे.बुधवारपासून शरद पवार यांनी विदर्भ दौºयाला सुरूवात केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
शरद पवार शनिवारी वर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:08 IST
राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार १८ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे येणार आहेत.
शरद पवार शनिवारी वर्धेत
ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार १८ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे येणार आहेत.