शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी वर्धेत शांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:56 IST

कश्मीर राज्यातील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सदर विकृत प्रवृत्तीच्या विरोधात शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांती मोर्चा काढला.

ठळक मुद्देसामाजिक संघटनांची एकत्रित जिल्हाकचेरीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कश्मीर राज्यातील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सदर विकृत प्रवृत्तीच्या विरोधात शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांती मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला-पुरुष व मुल-मुली सहभागी झाले होते.परिवर्तनवादी सामाजिक संघटना समन्वय समिती, कौमी एकता मंचच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या शांती मोर्चात सहभागी होण्यासाठी दुपारी १.३० वाजता महिला-पुरुष व मुला-मुलींसह तरुण-तरुणींनी बजाज चौक येथे एकत्र आले. स्थानिक बजाज चौक येथून दुपारी ३ वाजताच्या सुमारास निघालेल्या या मोर्चाने सोशालिस्ट चौक, बडे चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण करीत सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सदर शांती मोर्चाला पोलिसांनी न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविल्यावर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.मोर्चात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय इंगळे तिगावकर, तुषार देवढे, माजी नगर सेवक सलीम कुरेशी यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, अण्णाभाऊ साठे कलामंच, अध्ययन भारती, आधार संघटना, आयटक अंगणवाडी सेविका संघटना, आॅल इंडिया डेमोक्रेटीक युथ, आॅर्गनायझेशन, आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन, आॅल इंडिया मुस्लीम स्टुडंटस आदी विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.चार चिमुकल्यांनी केले मोर्चाचे नेतृत्त्वएवढ्या मोठ्या संख्येत निघालेल्या या मोर्चाची धुरा चार चिमुकल्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. एकूणच चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात चिमुकलेही शांत बसणार नाही, हेच त्यांच्यावतीने सांगण्यात येत होते.ठिकठिकाणी केली होती पाण्याची व्यवस्थामोर्चात सहभागी जनसमुदायाला तपत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी शांती मोर्चा जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.पोलिसांची दमछाकज्या मार्गाने सदर शांती मोर्चाने मार्गक्रमण केले त्या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाने इतर मार्गाने वळती केली होती. तपत्या उन्हात वाहतूक वळती करण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती.