वर्धा : जिल्ह्यात लिज, नझुलच्या जमिनीची सुमारे ४,७४२ प्रकरणे प्रलंबित आहेत़ यात शहरातील रागनगर भागातील लिजच्या जमिनींना २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचे पत्र शासनाने गुरूवारी निर्गमित केले आहे़ यामुळे रामनगर भागातील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे़ आता रामनगर भागातील जमिनींना पुन्हा २०२१ पर्यंत लिज नुतनीकरण प्राप्त होणार आहे़ शासनाने वाणिज्यिक, औद्योगिक, निवासी तसेच धर्मदाय कारणांसाठी जमिनी भाडे पट्ट्यांवर दिल्या. १९२४-२५ पासून अनेकांना अशा जमिनी मिळाल्या़ प्रत्येक ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाडेपट्ट्यांचे नुतनीकरण केले जाते. यासाठी शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे गुरूवारी तत्सम पत्र जारी करण्यात आले आहे़ शहरात नझुल लिजच्या जमिनीशी संबंधित २१९५ प्रकरणे आहेत. १९९१ ते २०२१ या ३० वर्षांकरिता लिजचे नुतनीकरण करण्यासाठी परवानगी प्रदान करण्यात आली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
रामनगरातील लिज जमीनधारकांना सात वर्षांचा दिलासा
By admin | Updated: March 27, 2015 01:20 IST