शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल्सचे सात टँकर्स जप्त

By admin | Updated: June 25, 2014 00:35 IST

एका टँकरमधील केमिकल पाईच्या सहायाने दुसऱ्या टँकरमध्ये भरून घोळ करीत असल्याचा संशय नारिकांना आला. यावरून पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे टँकर

सेलडोह शिवारातील घटना : अफरातफरीचा नागरिकांचा आरोप सेलू / सेलडोह : एका टँकरमधील केमिकल पाईच्या सहायाने दुसऱ्या टँकरमध्ये भरून घोळ करीत असल्याचा संशय नारिकांना आला. यावरून पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे टँकर जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले आहे. ही घटना सेलडोह शिवारात सोमलगढ येथे सामेवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघड झाली. ही कारवाई रात्री १ वाजेपर्यंत सुरू होती. या टँकरमध्ये कोणते केमिकल होते याचा तपास पोलीस करीत आहेत.सोमलगढ शिवारात सात टँकर आपसात टँकरमधील केमिकलची देवाण घेवाण करीत होते. याकडे गावातील नागरिकांचे लक्ष गेले. त्यांना यात मोठी अफरातफर होत असल्याचा संशय आला. त्यांनी टँकरजवळ उभ्या असलेल्यांना विचारणा केली असता या टँकरमध्ये डांबर असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांचा संशय आणखीच बळावल्याने नागरिकांनी घटनेची माहिती माहिती सिंदी (रेल्वे) पोलीस व सेलू तहसीलदारांना दिली. तहसीलदारांच्या सूचनेवरून नायब तहसीलदार यादव घटनास्थळी दाखल झाले; मात्र सिंदी पोलीस येऊन परत गेले. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेत कारवाई करीत सातही टँकर सिंदी पोलिसांना जप्त करण्याच्या सूचना नायब तहसीलदारांनी केल्या. पोलिसांनी सातही टँकर जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात नेले. पोलिसांनी जप्त केलेल्या टँकरचे क्रमांक एम एच १४ केपी ७८०४, एम एच १४ केवी ७८०३, एमएच १४ बीजे १९६४, एमएच ०४ एच ६७६५ व एमएच ०६ ए ४९२१ आहेत. घटनास्थळी सापडलेल्या अन्य दोन टँकरवर क्रमांक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या टँकरमध्ये काय होते याचा उलगडा अद्याप झाला नाही; मात्र या फर्निश केमिकल असल्याचा संशय नायब तहसीलदारंनी व्यक्त केला आहे. हे टँकर पोलिसांनी जप्त केल आहेत. ते ठाण्याच्या आवारात उभे आहेत. त्यात काय केमिकल होते याची तपासणी करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती ठाण्यातून देण्यात आली आहे. या प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)