शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुर्घटनांत सात जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: July 2, 2017 04:00 IST

राज्यात शनिवारी दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये सात जणांना बुडून मृत्यू झाला. वर्ध्यातील महाकाळी धरणात चौघांना जलसमाधी मिळाली. तर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/ सोलापूर : राज्यात शनिवारी दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये सात जणांना बुडून मृत्यू झाला. वर्ध्यातील महाकाळी धरणात चौघांना जलसमाधी मिळाली. तर, सोलापुरच्या सांगोला तालुक्यात बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला.वर्ध्याच्या आकोली येथील महाकाळी धरणावर शनिवारी दुपारी मित्रांसह फिरायला गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. सुदैवाने त्यांच्याबरोबर असलेले अन्य चौघे थोडक्यात बचावले. यातील एका मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. गौरव गुल्हाणे, श्वेता नेहारे, सोनल नाईक, शीतल प्रधान, स्नेहा पुनसे, आशिष वाघाडे, वैभव सलामे आणि कुणाल फुलकर हे महाकाळी धरणावर फिरण्याकरिता गेले होते. पाण्याचा अंदाज न घेताच धरणात उतरले. दगडावरील शेवाळावरून श्वेताचा पाय घसरल्याने दुसऱ्या मुलींनी तिचा हात पकडला. यात सोनल आणि शीतल या दोघीही पाण्याकडे ओढल्या गेल्या. त्यांना वाचविण्याकरिता गौरव गेला असता तोही पाण्यात बुडाला. तो गटांगळ्या खात असताना आशिष वाघाडे व वैभव सलामे हे दोघे त्याला वाचविण्याकरिता धावले, पण पोहोचण्यापूर्वीच गौरव पाण्यात बुडाला. स्नेहा पुनसे ही पाण्यात गटांगळ्या खात असताना तिला वाचविण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. तर, सोलापुरच्या सांगोला तालुक्यातील कटफळमध्ये शनिवारी सायंकाळी ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रोहन प्रकाश गुंजवटे (१०), संतोष अनिल धोत्रे (१०), गोपी दत्ता माने (१२) अशी मृतांची नावे असून ही इयत्ता ५ आणि ६ वीच्या वर्गात शिकणारी मुले आहेत़ शाळा सुटल्यानंतर ती पोहण्यासाठी गेली होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ती बुडाली.