शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

दहशत माजविणारे सात जण ताब्यात

By admin | Updated: November 13, 2015 02:09 IST

हातात तलवार व अन्य धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्या सात जणांवर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगणघाट येथील घटना : हातात शस्त्र घेऊन फिरताना अटकवर्धा : हातात तलवार व अन्य धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्या सात जणांवर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई हिंगणघाट येथील भगतसिंग वॉर्डात बुधवारी करण्यात आली.दत्ता, अविनाश हजारे, समीर भादा, शिरसाट या चार जणांसह अन्य तिघांचा यात समावेश आहे. त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हे सात जण बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातात शस्त्र घेऊन फिरत होते. शिवाय रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना धमकावित होते. याबाबत शालिनी पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी गाठून शस्त्रांसह सातही जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४४, १४७, १४८ अन्वये गुन्हा दाखल केला.(स्थानिक प्रतिनिधी)रांगोळीच्या दुकानातून जनरेटर पळविलेशहरातील बजाज चौक परिसरात असलेल्या एका रांगोळीच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने जनरेटर चोरून नेले. यात दुकान मालकाचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत गुरुवारी शहर ठाण्यात शुभांगी शेंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.मद्याच्या नशेत मुलांना मारहाणमद्याच्या धुंदीत असलेल्या इसमाने स्वत:च्या ८ व १० वर्षीय मुलांना काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना जोगाहेटी येथे गुरूवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. याबाबत देविदास सिडाम यांनी कारंजा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश टेकाम याच्यावर कलम ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. खोट्या सह्या करून साडे पाच लाखांची अफरातफरधनादेश तसेच अन्य कागदपत्रावर खोट्या सह्या करून खात्यातून साडे पाच लाख रुपयांची रक्कम अन्य खात्यात वळती केली. तसेच खातेदार दीपक पाटील रा. गौळ यांना साडे पाच लाखांनी गंडविले. याबाबत पाटील यांनी देवळी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अमोल कसनारे याच्यावर कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक पाटील यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत खाते आहे. या खात्यात असलेल्या रकमेचे धनादेश व विड्रॉलवर कसणारे यांनी खोट्या सह्या करून परस्पर रक्कम वळती केली. ही बाब पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. घटनेचा तपास देवळी पोलीस करीत आहेत.क्षुल्लक वादातून मारहाणशिवीगाळ करण्यास हटकले असता झालेल्या वादातून गजानन नागोसे याला अंकुश भानखेडे याने मारहाण करून जखमी केले. ही घटना पिंपळगाव येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत गजाननने गिरड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला.