शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना वर्ग एकचा सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:09 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबत जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य माणिक मलिये यांच्या पोर्टलवरील तक्रारीची नोंद घेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेअंती आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे), अल्लीपूर व सालोड तसेच अन्य पुनर्वसित गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना वर्ग दोनचा सातबारा रद्द करून वर्ग एकचा सातबारा वाटप करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सोमवारी लोकशाही दिनी मुख्यमंत्री सचिवालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कआर्र्वी : निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबत जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य माणिक मलिये यांच्या पोर्टलवरील तक्रारीची नोंद घेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेअंती आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे), अल्लीपूर व सालोड तसेच अन्य पुनर्वसित गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना वर्ग दोनचा सातबारा रद्द करून वर्ग एकचा सातबारा वाटप करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सोमवारी लोकशाही दिनी मुख्यमंत्री सचिवालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या निर्णयाने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. या गावातील नागरिकांना वर्ग एकचा सातबारा मिळण्यासाठी माजी आमदार दादाराव केचे यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू शासनाकडे मांडली होती. प्रकल्प ग्रस्तांच्या या मागणीला प्रशासकीय स्तरावर तर्कवितर्क लढवून फेटाळून लावले होते.प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी व घरे राष्ट्रहिताकरिता दिल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता त्यांचे फायदे त्यांना मिळू द्या, असेही मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना बजावले. मुख्यमंत्र्यांच्या यांच्या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला असून भूखंडाची मालकी मिळाली आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या व्यवहारांना दिलासा मिळाला आहे.कायद्यानेच दिला अधिकारजिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य माणिक मलिये यांनी महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम १६ उपकलम १ खंड ब मधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांची जुन्या गावठाणात जी भोगवट स्थिती होती त्याच स्थितीत पुनर्वसित गावठाणात भूखंड देण्यात यावे, तथापी जिल्हा प्रशासन ही बाब दुर्लक्षित करून भूखंड वाटप केल्यापासून दहा वर्षांचा काळ लोटल्या शिवाय वर्ग एकचे सातबारा देता येत नाही, असे सांगून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मुख्यमंत्रयांनी जिल्हाधिकारी यांचे म्हणणे फेटाळून लावत प्रकल्पातील सर्व गावठाणांना दहा वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता लगेचच वर्ग एकचा सातबारा देण्यात यावे, असे आदेशीत केले.