शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

बिबट्याच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

गुुरुवार १२ डिसेंबरला सकाळी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे पाय व मुंडके शरीरावेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.घटनास्थळाचा पंचनामा करुन बिबट्याचे शवविच्छेदन करुन अग्नी देण्यात आला.

ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील मांडवा शिवारात गुरुवारी सकाळी दोन ते अडीच वर्षीय बिबटाचा मृतदेह आढळून आला. बिबट्याचे पाय व मुंडके शरिरापासून वेगळे केल्याचे निदर्शनास आल्याने शिकार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. याप्रकरणी वनविभागाने तपास करुन सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून विविध अवयव जप्त करण्यात आले.गोविंद केकापुरे, प्रवीण बुरघाटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहुल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याने वनविभागाकडून सांगण्यात आले.यासोबतच काही संशयीतांनाही ताब्यात घेतले असल्याने यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुुरुवार १२ डिसेंबरला सकाळी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे पाय व मुंडके शरीरावेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.घटनास्थळाचा पंचनामा करुन बिबट्याचे शवविच्छेदन करुन अग्नी देण्यात आला. त्यानंतर तपासचक्र गतीमान करुन प्रारंभी संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हाची कबुली देताच सात जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून बिबट्याचे तीन पंजे, मुंडके, शेपूट व जननेंद्रिय जप्त केले.ही कारवाई सहायक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे, वनपरिक्षेत्राधिकारी सागर बनसोड, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपूरकर, श्याम परटके, रवी राऊत यांच्यासह मनीष कुडके, रामचंद्र तांबेकर, विनोद सोनवणे, माधव माने, धनराज मजरे, जाकीर शेख, प्रेमजीत वाघमारे, दिनेश उईके, दिनेश मसराम, वसंत खेळकर,नीलेश राऊत, चंदू कुटारे, गिरीश गायकवाड यांनी केली.डुकराकरिता लावलेल्या फासात अडकला बिबटमांडवा या शिवारातील बेलगाव परिसरात गोविंदा केकापुरे या शेतकºयाने शेतात रानडुकराकरिता फास लावला होता. त्या फासात डुकराऐवजी बिबट अडकला. फासात अडकलेला बिबट शेतकºयाला मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर शेतकऱ्याने परिसरातील इतर व्यक्तींच्या संगणमताने बिबट्याचे अवयव कापले, असे सांगितले जात आहे. त्यामुळे वनविभागाने या दिशेनेच तपास चक्र फिरविले असून यात आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग