शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:29 IST

मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम चांदी जप्त केली आहे. रामा देवराव देऊळकर (२३), किसना रमेश राऊत (२५), राजू उर्फ काल्या रामा दांडेकर (२६) व मंगेश बाबुलाल गुंजेवार (२४) सर्व रा. बोरगाव (मेघे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देशहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या : सोन्या-चांदीसह रोख जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम चांदी जप्त केली आहे. रामा देवराव देऊळकर (२३), किसना रमेश राऊत (२५), राजू उर्फ काल्या रामा दांडेकर (२६) व मंगेश बाबुलाल गुंजेवार (२४) सर्व रा. बोरगाव (मेघे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.चोरट्यांच्या सात जणांच्या या टोळीतील दोन जण सध्या कारागृहात असून ते चोरीच्या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. तर शंक उर्फ शंक्या राऊत हा फरार आहे. याच टोळीतील चोरट्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारील सुनील उमरे यांच्या घरासह देशोन्नती कार्यालयातही चोरी केली होती. विशेष म्हणजे या टोळीतील दोन सदस्य चोरीपूर्वी रेकी करीत तर चोरी करताना तीन जण कुणी येत तर नाही ना या बाबात पाळत ठेवत होते. या चोरट्यांनी चोरीच्या सोन्याच्या दागिण्यांची विल्हेवाट वर्धेतील एका सराफा व्यावसायिकाकडे लावली होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात एएसआय दत्तात्रय ठोंबरे, विवेक लोणकर, बाबाराव बोरकुटे, पोलीस शिपाई राजू वैरागडे, सचिन इंगोले, जगदीश चव्हाण, महादेव सानप, अरविंद घुगे, रितेश गुजर, दिनेश राठोड, गितेश देवघरे, सचिन दिक्षीत, पवन निलेकर, विकास मुंडे, गंगाधर चांभारे यांनी केली.या गुन्ह्याची दिली कबुलीसदर चोरट्यांनी एकूण सात चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. परंतु, त्यांच्याकडून अधिक काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या चोरट्यांनी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी असेलेल्या मदन बाबुराव चतुरकर रा. शिवार्पणनगर नालवाडी, अनुराग रमणलाल बंसल रा. गणेशनगर बोरगाव (मेघे), श्रीरंग मारोतराव वाघमारे रा. भिमनगर, सुनील श्रीरत्न उमरे रा. पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारी, सिव्हिल लाईन वर्धा, रूपराव विठ्ठल हारगुडे रा. हरिहरनगर वर्धा यांच्या घरी चोरी केली. तर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आशीष अनिल गाथे रा. धंतोली व बॅचलर रोड वरील देशोन्नती कार्यालयातही चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.