शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

सेवाग्राम ‘वर्ल्ड हेरिटेज’ व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:00 AM

ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गांधीजींच्या स्मृती जपणाऱ्या सेवाग्राममधील कर्मचाऱ्यांचे तसेच चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची स्क्ल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कुलचे कौतूक केले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : विकास आराखड्यातील कामांचा ई-श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग फुकणारा आणि चळवळीची बीजारोपण करणारा सेवाग्राम आश्रम जगभरातील गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण व्हावे, यादृष्टीने आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज आहे. शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो, हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्धेकरांना दिला असून या आश्रमला लवकरच भेट देणार असल्याचेही सांगितले.महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या सप्ताहनिमित्ताने सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुनील केदार, जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजीत कांबळे, वित्त व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे आदींची उपस्थिती होती. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि विनोबा भावे यांना अभिवादन करुन मुख्यमंत्री म्हणाले, महात्मा गांधी एक विचार आहे. ‘खेड्याकडे चला’ या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आज आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांची ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गांधीजींच्या स्मृती जपणाऱ्या सेवाग्राममधील कर्मचाऱ्यांचे तसेच चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची स्क्ल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कुलचे कौतूक केले. कार्यक्रमादरम्यान महात्मा गांधी यांचे सेवाग्राम येथील वास्तव्य आणि येथून झालेल्या स्वातंत्र्य चळवळीबाबत तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांवर आधारीत तयार केलेल्या चित्रफिती दाखविण्यात आल्यात. संचालन ज्योती भगत तर आभार जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी मानले.निधीची कमतरता पडू देणार नाही : अजित पवारगांधीजींच्या पदस्पशार्ने पावन झालेल्या सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे. सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाची कामे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी झाडे लावण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच बापूंनी विचारातील स्वयंपूर्ण गावे, जलस्त्रोत आणि गावांच्या स्वच्छतेवर भर देऊन देशाची वाटचाल शाश्वत विकासाकडे झाली तर तेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.श्रेयासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण : पंकज भोयरराज्य सरकारची अस्थिर स्थिती पाहता श्रेय घेण्यासाठी गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी सरकारने अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. ज्या कामांचे लोकार्पण झाले त्यातील एकही काम पूर्ण झाले नाही, असा आरोप आ. डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे. भाजपच्या काळात तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखड्याला कोट्यवधीचा निधी दिला. यातून सेवाग्राम-पवनार-वर्धा येथे अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. शिवाय वेळोवेळी निधीची तरतूद करण्यात आली. परंतु, महाविकास आघाडीने या निधीला कैची लावली. यामुळे विकास कामे थांबली आहे. जे काम सुरू करण्यात आले होते, ते अपूर्ण आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम