शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:20 IST

आठवडी बाजारातील मटन मार्केट हटवावे तथा अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचने २७ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी या आंदोलनाला यश आले. मंचच्या सर्व मागण्या मान्य करीत दोन महिन्यांत दुकाने हटविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.

ठळक मुद्देमागण्या मान्य : दोन महिन्यांत हटविणार दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : आठवडी बाजारातील मटन मार्केट हटवावे तथा अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचने २७ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी या आंदोलनाला यश आले. मंचच्या सर्व मागण्या मान्य करीत दोन महिन्यांत दुकाने हटविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली.बाजार परिसरात मंदिर, व्यायाम शाळा, ग्रा.पं. कार्यालय आहे. शिवाय मटन मार्केटमुळे भाजी बाजाराला जागा अपुरी पडत होती. तेथील गाळे निकामी पडून होते. या विरूद्ध जन युवा मंचने ग्रा.पं. कार्यालयाच्या मार्गावर २६ जानेवारी रोजी जाहीर सभा घेत मिरवणूक काढली व २७ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले. शिवसेनेच्या पाठींब्याने जन युवा मंचचे अध्यक्ष योगेश वरभे व ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे हे उपोषणास बसले होते. पहिल्या दिवशी कुठलीही तडजोड झाली नाही तर दुसºया दिवशी सुटी आल्याने चर्चा टळली. तिसºया दिवशी प्रदीप नागपुरे व पं.स. सदस्य अमोल गायकवाड यांनी मध्यस्थी केली; पण ग्रा.पं. ने पाच महिन्यांची वेळ मागितली. जन युवा मंचने ती अमान्य केल्याने चौथ्या दिवशी दामुजी घुसे, अमोल गायकवाड, गोपाल गिरडे यांनी पुन्हा मध्यस्थी करीत तडजोड केली.ग्रा.पं. प्रशासनाने चौथ्या दिवशी सर्व मागण्या मान्य करीत गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तहसीलदार सचिन यादव यांच्याशी चर्चा केली. शिवाय दोन महिन्यांत मटन मार्केटची जागा मोकळी करून अन्य समस्या मार्गी लावण्याची लेखी ग्वाही देण्यात आली. यावरून सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामविकास अधिकारी अशोक गव्हाळे, ठाणेदार विजय नाईक, तलाठी धोंगडी यांनी उपोषणकर्ते वरभे, मेघरे यांना लिंबुपाणी देऊन उपोषण सोडविले.यावेळी सतीश व नितीन चंदनखेडे, गोपाल गिरडे, माधव ढगे, कैलास हुलके, अरविंद साखरकर, दशरथ पेटकर, प्रितम वरघणे, नितीन सेलकर, राजू रेंढे, रामू बाळबुधे, कैलास पिंपळापुरे, युसूफ कुरेशी यासह मंच व सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.