शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ५० वर तक्रारींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:30 IST

देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांतील कामगिरी : वर्धा न.प.चे स्वच्छतेच्या दिशेने पडतेय पाऊल

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या अ‍ॅपच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.‘स्वच्छता एमओएचयूए’ हे मोबाईल अ‍ॅप प्रत्येक स्मार्ट फोनच्या प्ले-स्टोअरमधून नागरिकांना ‘इन्स्टॉल’ करता येते. अ‍ॅपचे इंस्टॉलेशन होताना पडताळणीसाठी मोबाईल क्रमांकाची विचारणा केली जाते. भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविताच चार अंकी ओटीपी क्रमांक प्राप्त होतो. तो आवश्यक त्या ठिकाणी नोंदविताच मोबाईल सिस्टीमशी जुळत सदर मोबाईल धारकाचे लोकेशन ट्रेस होते. त्यानंतर इंस्टॉल झालेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या नागरिकांना छायाचित्रासह अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदविता येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही सेकंदात त्याची माहिती आॅनलाईन पद्धतीने वर्धा नगर पालिकेतील कर्मचाºयांपर्यंत पोहोचते. त्या तक्रारींचा निपटारा दोन दिवसांत करणे क्रमप्राप्त असून सध्या वर्धा न.प. प्रशासन प्रत्येक तक्रार आठ तासांतच निकाली काढत आहे. परिणामी, वर्धा न.प. ची ही कामगिरी स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल ठरत आहे. ‘स्वच्छता एमओएचयूए’ या अ‍ॅपच्या माध्यमातून वर्धा न.प.ला दोन महिन्यांत एकूण ५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी ५१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून उर्वरित सात तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.अवघ्या आठ तासांत तक्रारींचा निपटारामोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा निपटारा ४८ तासांत करणे क्रमप्राप्त आहे, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत; पण स्वच्छ, सुंदर व हरित वर्धा शहराचे उद्दिष्ट उराशी बाळगणाऱ्या वर्धा नगर पालिकेच्यावतीने प्राप्त तक्रारी अवघ्या आठ तासांतच निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.अभिप्राय नोंदविण्याची सुविधाशहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक पालिकेद्वारे करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच न.प.तील संगणक अभियंता अनूप अग्रवाल ती त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला वळती करतात. अवघ्या आठ तासांत त्यावर कार्यवाही करीत स्वच्छता निरीक्षक झालेल्या कार्यवाहीची माहिती छायाचित्रासह अपलोड करतात. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारकर्त्याला आपला अभिप्राय देता येत असल्याचे सांगण्यात आले.केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे. अस्वच्छतेबाबतची तक्रार या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या करता येते. शिवाय तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीबाबतही अभिप्राय नोंदविता येतो. अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी तथा न.प.च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल अ‍ॅप आपल्या स्मार्ट फोनमध्ये इन्स्टॉल करावा.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.