शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

रुग्णसेवा करताना परिचारिकांमध्ये समर्पण भाव हवा

By admin | Updated: November 18, 2015 02:19 IST

परिचर्या हा रुग्णसेवेचा कणा आहे. रुग्णांची सुश्रुषा करताना परिचारकांनी समर्पण, प्रेमभाव आणि त्यागाची भावना आपल्या मनात निरंतर जोपासली पाहिजे, ....

पुरुषोत्तम मडावी : राधिका मेघे परिचारिका महाविद्यालयात ‘लॅम्प लायटिंग समारोह’वर्धा : परिचर्या हा रुग्णसेवेचा कणा आहे. रुग्णांची सुश्रुषा करताना परिचारकांनी समर्पण, प्रेमभाव आणि त्यागाची भावना आपल्या मनात निरंतर जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दीपप्रज्वलन व शपथविधी समारोहात ते बोलत होते. दत्ता मेघे सभागृहात आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. व्ही. के. देशपांडे तर अतिथी म्हणून विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी. गोयल, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. श्याम भुतडा, परिचारिका शिक्षण समन्वयक मनीषा मेघे, व्ही. आर. मेघे, प्राचार्य बी. डी. कुळकर्णी, परिचर्या संचालक सिस्टर टेसी सॅबेस्टियन, प्राचार्य बेबी गोयल, अधिष्ठाता वैशाली ताकसांडे, अधिपरिचारक नीरज कलहारी आदी उपस्थित होते.याप्रसंंगी प्राचार्य बी.डी. कुळकर्णी व बेबी गोयल यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी, प्रा. सीमा सिंग व शालिनी मून यांनी बी.एससी. नर्सिंग, जनरल नर्सिंग अ‍ॅन्ड मिडवायफरी(जीएनएम) आणि आॅक्झिलरी नर्सिंग अ‍ॅन्ड मिडवायफरी (एएनएम) शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शपथ दिली.अभ्युदय मेघे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल तसेच ज्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत अशा कुटुंबाकरिता विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात येईल, असे जाहीर केले. यावेळी, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींना पुरस्कार देण्यात आले. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मानसिक आरोग्य सप्ताहातील सक्रीय विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन इंदू अलवडकर व जया गवई यांनी केले तर आभार वैशाली ताकसांडे यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्रा. रंजना शर्मा, अर्चना मौर्या, नीलिमा रक्षाले, वैशाली तेंडुलकर, रुचिरा अनकर, सविता पोहेकर, मंजुषा महाकाळकर, बिबिन कुरीयन, दीपलता मेंढे, विशाल पाखरे, रोशन ठवकर, प्रतिभा वानखेडे, अख्तरी शेख, स्रेहा धनवीज, दीपाली घुंगरूड आदींनी सहकार्य केले. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)