शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन संशयास्पद मृतदेहांमुळे खळबळ

By admin | Updated: June 25, 2014 00:36 IST

तालुक्यातील वडाळा (श़) व बोरगाव (टुमणी) या गावांत लागोपाठ दोन मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या विहिरीत व शेजारी बेवारस अवस्थेत आढळले़ यातील एक मृतदेह पूर्णपणे कुजला आहे़

शरीरावर घाव : दोन्ही तरुण समवयस्कआष्टी (शहीद) : तालुक्यातील वडाळा (श़) व बोरगाव (टुमणी) या गावांत लागोपाठ दोन मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या विहिरीत व शेजारी बेवारस अवस्थेत आढळले़ यातील एक मृतदेह पूर्णपणे कुजला आहे़ यातील एक घटना सोमवारी व दुसरी मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़सोमवारी वडाळा(श़) गावाशेजारी अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या विहिरीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रमाकांत दुर्गे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला़ गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह गावातील मंगेश डाखोरे (२५) याचा असल्याचे समोर आले. मंगेश शुक्रवारपासून पासून बेपत्ता होता़ त्याच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याच्या जखमा होत्या़ मंगेशला गावातीलच काही लोकांनी घरातून बोलावून नेले व यातून मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे़ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आकस्म्कि मृत्यूची नोंद करण्यात आली. ठाणेदार दुर्गे मंगेशच्या मृत्यूचा तपास करीत आहे़ मंगेशची आत्महत्या नसून त्याची हत्याच करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे़ यापूर्वी त्याच्या मोठ्या भावाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती़ त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, वृद्ध आईवडील आहे़या घटनेचा तपास होतो न होतो मंगळवारी बोरगाव (टुमणी) गावाशेजारी अप्पर वर्धा धरणाच्या काठावर पाण्यात कुजलेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ तो मृतदेह गावातील शिवहरी भाऊराव परतेती (२६) याचा असल्याचे निष्पन्न झाले. शिवहरी चार दिवसांपासून घरून बेपत्ता होता़ त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजला होता़ पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन घटनास्थळी करण्याची मागणी केली़ मात्र डॉक्टरांनी येण्याचे टाळल़े़ लागोपाठ दोन्ही दिवशी सारख्याच घटना उघडकीस आल्यामुळे खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिवहरीच्या पश्चात तीन बहिणी, आईवडील आहे. ठाणेदार दूर्गे तपास करीत आहे़ शिवहरी व मंगेशचा मृतदेह सारख्याच प्रकारात सापडल्याने सामूहिक हत्याकांड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़ याप्रकरणी पोलिसांनी अकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे़(प्रतिनिधी)