लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्यामजी पंत) : येथील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या कडुनिंबाच्या जुन्या डोलदार वृक्षाने अचानक पेट घेतला. यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ माजली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील सारेच अवाक् झाले.झाडाला आग लागल्याचे लक्षात येताच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तर तत्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस, महावितरण आणि अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाने आगीवर ताबा मिळविता आला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास विझलेल्या या आगीने पुन्हा १.३० वाजता भडका घेतला. हिरवे झाड एका नाही तर दोन वेळा अचानक पेटल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. पुन्हा लागलेली आग विझविण्यात आली आहे.सकाळच्या सुमारास या झाडातून अचानक धूर निघत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. पाहता पाहता त्यातून आगीच्या ज्वाळा यायला सुरुवात झाली आणि झाडाने अचानक पेट घेतला. विशेष म्हणजे हे पूर्ण झाड हिरवेगार असून मुख्य रस्त्यावर असल्याने याच्या खालून शेकडो नागरिक अवागमान करीत असतात. झाडाने पेट घेतल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली.घटनास्थळी स्थानिक पोलीस कर्मचारी व मार्केट लाईनच्या व्यापारी वर्गाने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जोरे यांनी आर्वी नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या वाहनाला प्रकाराची माहिती दिली. लागलीच याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव टाले यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आपल्या सहकाºयांच्यावतीने ती आग विझवण्याचा प्रयत्न कला. यावेळी तळेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड यांनी सचिन साठे, देवेंद्र गुजर, परवेज खान यांच्या मदतीने पुन्हा या झाडाला लागलेली आग विझवली. विशेष म्हणजे या झाडाच्या आजुबाजुने मोठी वस्ती आहे.हे झाड ज्या परिसरात आहे त्या भागात मोठी लोकवस्ती आहे. यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आज दोन वेळा पेटलेल्या या झाडाने रात्रीच्या वेळी जर पुन्हा पेट घेतला तर येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
झाडाने अचानक पेट घेतल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:06 IST
येथील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या कडुनिंबाच्या जुन्या डोलदार वृक्षाने अचानक पेट घेतला. यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ माजली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील सारेच अवाक् झाले.
झाडाने अचानक पेट घेतल्याने खळबळ
ठळक मुद्देपोलीस ठाण्यासमोरील घटना : अग्निशमन दलाला पाचारण