शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:32 IST

सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून सदर साहित्य ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून सदर साहित्य ताब्यात घेतले.जि.प. कार्यालयाच्या परिसरात एका प्लास्टिकच्या डब्यात काही इेलक्ट्रीक साहित्य व त्याला हिरवे व लाल रंगाचे वायर जोडून असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. सदर साहित्य बॉम्ब तर नाही ना, अशी शंका उपस्थित करीत घटनास्थळी जमा झालेल्या बघ्यांच्या गर्दीतील काही सुजाण नागरिकांनी याबाबत त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलीस नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असलेल्या एएसआय दिलीप हजबे यांनी सदर माहिती तात्काळ बॉम्ब शोध पथकाला दिली. माहिती मिळताच सदर पथकाने घटनास्थळ गाठून मोठ्या सतर्कतेने सदर साहित्य आपल्या ताब्यात घेतले. बॉम्बसदृश साहित्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चिप, बॅटरी, एलईडी लाईट, टॅक्टीकल स्विच, वायर आदींचा समावेश होता.सदर साहित्य जप्त केले आहे. प्रथमदर्शी ते बॉम्बसदृश वाटत असले तरी बारकारईने पाहिल्यास त्यात कुठलेही स्फोटक आढळले नाही. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने एखादा प्रकल्प तयार केला असावा. ते नियोजित स्थळी नेताना वाटेत नकळत पडले असावे. ते बॉम्ब नाही.- हेमंत बावणे, सहायक पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोध पथक, वर्धा.