शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

आता शिक्षकांना काढावा लागेल विद्यार्थ्यांसोबत 'सेल्फी'

By admin | Updated: November 7, 2016 00:49 IST

स्थलांतरित व शाळेत अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत;...

अनियमित विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न : सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करण्याचा आदेश भंडारा : स्थलांतरित व शाळेत अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत; पण शाळेच्या परिसरात राहूनही वर्गात बुट्टी मारण्याचे प्रमाण कमी झाले नाही. यामुळे हे विद्यार्थी शाळेत येतात की नाही, हे शिक्षण विभागासमोर सिद्ध करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावे, असा अफलातून आदेश शासनाने जारी केला आहे.मागील शैक्षणिक वर्षात गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत काही योजना सुरू करण्यात आल्या; पण प्रगत शाळांची संख्या ६० टक्क्यांच्या पलिकडे जाऊ शकली नाही. यामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी शासनाने ही मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध यंत्रणांच्या पाहणीनुसार शासनाने शाळाबाह्य मुलांचे तीन प्रकार जाहीर केले. यात स्थलांतरित कुटुंबासह अन्य ठिकाणी जाणारी मुले (राज्यांतर्गत स्थलांतर) इतर राज्यांतून स्थलांतरित कुटुंबांसह येणारी मुले आणि शाळेच्या परिसरात वास्तव्यास असणारे तसेच शिक्षकांच्या प्रयत्नानंतरही शाळेत नियमित न येणारी मुले आदींचा समावेश आहे. स्थलांतरित कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या वयातील मुलांना त्यांच्या पालकांनी त्याच कुटुंबातील; पण स्थलांतरित न होणाऱ्या वयस्क मंडळी आजोबा, आजीसोबत राहण्यास प्रवृत्त करावे. ही व्यवस्था होऊ शकल्यास गावातील इतर कुटुंब ज्यांच्यावर संबंधित कुटुंबांचा विश्वास आहे, त्यांच्या घरी या मुलांची व्यवस्था करावी, अशी अफलातून सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे. इतर राज्यांतील मुले व पालक रोजगारासाठी विशेषत: शहरांतील बांधकामाच्या ठिकाणी पर राज्यातील कामगार अधिक प्रमाणात असतात. काही वेळा हे कामगार २ ते ३ वर्षे एकाच ठिकाणी राहतात. या कामगारांची मुले इतर राज्यांतून येत असल्याने त्यांची मातृभाषा मराठी नसते; पण या मुलांना मराठी शाळांमध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे. बहुभाषिक शिक्षणाबाबत विद्या प्राधिकरणाने दिलेल्या पुस्तकांमधील दिशानिदेर्शांचा उपयोग करून मुलांना शिक्षण द्यावे. तथापि, एकाच ठिकाणी अशा मुलांची संख्या २० पेक्षा अधिक असल्यास त्यांच्यासाठी संबंधित भाषेचे जाणकार शिक्षक इतर ठिकाणी आणता येतील, असे सुचविण्यात आले. सीएसआर वा लोकसहभागातून हा खर्च भागविण्याचा सल्ला देण्यात आला. परिसरात राहूनही नियमित शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या फारच चिंताजनक आहे. या मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षक, अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण यश आले नाही. काहीवेळा शिक्षणाची गुणवत्ता योग्य नसल्याने या मुलांना शाळेत येऊनही काही फायदा झाला नाही. परिणामी, ही मुले पुन्हा शिक्षणापासून दूर गेली. शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धत स्वीकारल्यास या समस्येवर मात करता येईल, असेही आदेशात नमूद आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने काही पर्याय शिक्षकांसमोर ठेवले आहेत. जानेवारी २०१७ पासून महिन्याच्या दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या मुलांमधून प्रत्येकी १० गट तयार करावे व त्यांच्या सोबत सेल्फी काढावे. या सेल्फीतील मुलांची नावे आधार क्रमांकासह सेल्फी सरलमध्ये अपलोड करावे. दुसऱ्या आठवड्यानंतर अनियमित मुलांचे सेल्फीसोबत नाव, आधार क्रमांक नोंदवावे. या पद्धतीने केवळ अनियमित मुलांसाठी काम करणे शक्य होईल व सेल्फी अपलोड करण्याचा वेळ वाचेल, असे सांगण्यात आले. या आदेशाचे पालन कसे करावे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. (नगर प्रतिनिधी)गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती देण्याचे आदेशअनियमित असलेल्या विद्यार्थ्यांचे सेल्फी काढणे, त्यांचे आधार क्रमांक मागविणे आणि सरलमध्ये अपलोड करणे या प्रक्रियेतच शिक्षकांचा वेळ जाणार आहे. यासह तालुकानिहाय गैरहजर विद्यार्थ्यांच्या संख्येची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे या आदेशांचे पालन कसे करावे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. शाळेतील गुणवत्ता सुधारावेत, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करावे व हजर विद्यार्थ्यांचा सेल्फी काढावा आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.