शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्मचाºयांचा लक्ष्मीपूजनाला आत्मक्लेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:36 IST

जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला.

ठळक मुद्देज्येष्ठांचा लढा : समस्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला. आठव्या दिवशी बैठा सत्याग्रह सेवाग्राम आश्रम परिसरात सुरू आहे. अद्याप आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून लक्षीपूजनाच्या दिवशी आत्मक्लेष आंदोलन करणार येणार आहे.सेवाग्राम आश्रमासमोर असंघटीत सर्व जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे. २००७-०८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅज्युटी अधिक रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त भत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित अदा करावा, २०१० पासून स्वेच्छा निवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, राज्य शासनाच्या ३ आॅगस्टच्या निर्णयानुसार कार्यमुक्त केलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅज्युटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक महागाई भत्ता, प्रलंबित नियमित वेतन, स्वेच्छा निवृत्तीची नुकसान भरपाई तसेच २००१ ते २००९ या कालावधीतील महागाई भत्ता त्वरित द्यावा आदी मागण्यांसाठी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात सदर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सतीश काळे, अशोक मगर, सागर कुत्तरमारे, मधुकर प्रांजळे, सुरेश रहाटे, वानखेडे, चित्रकला रहाटे आदी सहभागी झाले आहेत. तसेच तोडगा निघाला नसल्याने गुरूवारी आत्मक्लेष करणार आहे.लक्ष्मीपूजनाला विदर्भातील अनेक सहकारी सहभागी होणार१९ आॅक्टोबरला सकाळी १० वाजतापासून प्रारंभ होणाºया आत्मक्लेष आंदोलनात विदर्भातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहचारिणी व कुटुंबासह सहभागी होतील. राज्यकर्त्यांनी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर आर्थिक देण्याबाबत निर्णायक पाऊल उचलून सकारात्मक कार्यवाही न केल्यास, शासनाची ही कृती बेजवाबदार ठरेल असा खेद व्यक्त केला.जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर असताना पारदर्शक शासन मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा खेद आंदोलनकर्त्यांना व्यक्त केला. दिवाळी सणाच्या दिवशी १९ आॅक्टोबरला रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णय होईपर्यंत सत्याग्रह अखंड चालूच राहणार असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.