शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वर्धिनीमुळे उभारली स्वयंसहाय्यता गटाची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:30 IST

दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये समूदाय संसाधन व्यक्तीची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे.

ठळक मुद्देनितीन मडावी : उमेद अंतर्गत वर्धिनीचे स्रेहसंमेलन व स्वयंसहाय्यता गटाच्या उत्पादनाची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये समूदाय संसाधन व्यक्तीची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. वर्धा येथील उमेद अंतर्गत वर्धिनी या सामाजिक समावेशन संस्थात्मक बांधणीमध्ये महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धिनी या १५ दिवस ते ४५ दिवस घराबाहेर राहून कामकरीत असून काम करण्यात अग्रेसर आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचे नाव होत आहे. जिल्ह्यात स्वयंसहायता गटाची चळवळ निर्माण झाली. यामुळे प्रत्येक महिलेने उद्योगशील व्हावे, असे प्रतिपादन, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत वर्धिनी स्रेहसंमेलन व स्वयंसहाय्यता गटातील तयार करण्यात येणारे प्रोडक्ट व खाद्य पदार्थ विक्रीच्या तीन दिवसीय प्रदर्शनीचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धाद्वारे आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण सभापती निता गजाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, प्रकल्प अधिकारी संचालक डॉ. करूणा जुईकर, राज्य अभियान व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी वैशाली ठाकूर, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, वर्धिनी कक्ष प्रमुख अमोलसिंग रोटेले उपस्थित होते.राज्यातील सामाजिक समावेशनाचे कार्य १३ जिल्ह्यातील वर्धिनी म्हणून वर्धेमार्फत यवतमाळ, गोंदीया, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, अमरावती येथे करण्यात आले आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये ४,९६८ तर वर्ष २०१६-१७ मध्ये ४,६३५ असे एकूण स्वयंसहाय्यता गट ९,६०३ बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली. गरीबातील गरीब घटकांना त्यांची जागा मिळून देण्यासाठी कार्य करताना वर्धिनीच्या माध्यमातून गरीबीच्या दुचक्रातून बाहेर निघण्याचे मार्ग त्यांचे अधिकार या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना फक्त स्वयंसहाय्यता समूहामध्ये सहभागी होणे असून हे त्यांच्या स्वत:चा विकास व कुटुंबाचा विकास योग्य पद्धतीने करीत आहे. या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्धिनींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. वर्धिनीद्वारे २०१६-१७ मध्ये केलेल्या कामाचे पुस्तक तयार करण्यात आले असून याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.