शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय चौकशी मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:41 IST

सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके प्रकरण गंभीर असून पोलिसांचा या प्रकरणातील हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी म्हणून सदर प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची शिफारस आयोगामार्फत करणार आहे,.....

ठळक मुद्देशुभांगी उईके हत्या प्रकरणात माया इवनाते यांची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके प्रकरण गंभीर असून पोलिसांचा या प्रकरणातील हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी म्हणून सदर प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची शिफारस आयोगामार्फत करणार आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., संशोधन अधिकारी वाय.के. बन्सल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण उपस्थित होते.तरूण मुलींबाबत पोलिसांची असंवेदनशीलता यात प्रकर्षाने दिसून येते. सद्यस्थितीत दुर्लक्ष केलेल्या बाबींची आणि पुराव्यांची पोलिसांनी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल आयोगाला सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. मुलीच्या आई-वडिलांना साह्य व्हावे म्हणून आदिवासी विभागाकडून त्वरित ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. मनोधैर्य योजनेतून या प्रकरणी आर्थिक सहकार्य करावे. भूमिहिन असलेल्या मुलीच्या आई-वडिलांना दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेचा लाभ द्यावा, असेही त्यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांनी घटनेच्या तपासाबद्दल संपूर्ण माहिती दिली. याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचेही सांगितले. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यापूढे यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, अशी हमी दिली.जिल्हाधिकारी नवाल यांनी या प्रकरणी प्रशासन अतिशय संवेदनशील असून प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वस्त केले. यावेळी मयत मुलीची आई उपस्थित होती.शुभांगीच्या घरी भेट देत केली चौकशीगुरूवारी सकाळी आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांनी मयत शुभांगी उईके हिच्या घरी भेट देऊन चौकशी केली. यावेळी शुभांगी उईके हिच्या मामांनी संपूर्ण माहिती दिली. बैठकीमध्ये शुभांगीच्या आईने मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.