शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

निकृष्ट काम पाहून उपसभापतीही अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:40 IST

येथील दवाखान्याच्या इमारतीला लोकार्पण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेलेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सेलू पं.स.च्या उपसभापती सुनीता अडसड यांनी बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांना धक्काच बसला.

ठळक मुद्देचौकशी करून कारवाई करण्याचे दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : येथील दवाखान्याच्या इमारतीला लोकार्पण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेलेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सेलू पं.स.च्या उपसभापती सुनीता अडसड यांनी बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.गावातील आयुर्वेदिक दवाखाना इमारत बांधकामासाठी तथा संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. इमारतीचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते; पण निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न प्रत्येक स्तरावर होत आहे. येथील शाखा अभियंता खरवडे यांनी कधीही कामाची पाहणी केली नाही. जागेवर बसून कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे कामाचे मूल्यांकन करून दिले व त्याआधारे ग्रामसेवकाने बिल अदा केले.कामाच्या दर्जाकडे ग्रामसेवक व शाखा अभियंत्याने कधीही लक्ष दिले नाही. यामुळे सदर इमारत धोकादायक झाली आहे. इमारतीचा पाया जमिनीपासून विलग झाला असून जागोजागी इमारतीला तडे गेले आहेत. दवाखान्यात लावलेल्या टाईल्सही उखडल्याचे उपसभापती अडसड यांच्या पाहणीत आढळून आले. कामाचा दर्जा पाहून उपसभापतींनी संताप व्यक्त केला. या बांधकामाची सखोल चौकशी करावी. दोषी कंत्राटदार, अधिकाºयांवर त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी बीडीओला दिलेत.संगनमत करून लाटला निधीशाखा अभियंता, कंत्राटदार तथा तत्कालीन ग्रामसेवकाने संगणमत करून इमारत बांधकामातील निधी लाटल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य रजनी दखणे, रमेश काकडे, अमोल अनकर यांनी केला आहे.काम अपूर्ण असताना कंत्राटदाराला संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली होती. शेवटी कंत्राटदारांची मनधरणी करून काल-परवापासून विद्युत फिटींगचे काम सुरू करण्यात आले, ही आश्चर्याचीच बाब आहे.‘लोकमत’ने प्रकाशित केलेले वृत्त खरे आहे. मी स्वत: इमारत बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यात इमारत दबते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. याबाबत गटविकास अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले असून मासिक सभेत हा विषय चर्चिला जाणार आहे.- सुनीता अडसड, उपसभापती, पं.स. सेलू.