शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गोंधळ पाहून सभापतीही झाल्या अवाक्

By admin | Updated: September 18, 2016 00:56 IST

जि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे यांनी दोन जि.प. सदस्यांसह अंगणवाड्यांची तपासणी केली.

अंगणवाडीमधील प्रकार : अचानक दिलेल्या भेटीत भोंगळ कारभार उघडरोहणा : जि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे यांनी दोन जि.प. सदस्यांसह अंगणवाड्यांची तपासणी केली. शुक्रवारी अचानक अंगणवाड्यांना भेट दिली तेव्हा तेथील गोंधळ पाहून सर्व अवाक् झाले. अंगणवाडी सेविका जि.प. सभापतींना ओळखत नसल्याचे निदर्शनास आले, हे विशेष! एका अंगणवाडीत तर फलकावर लिहिलेली तारीखही जुनीच असल्याचे आढळले.जि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे येथील जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे व कारंजा तालुक्यातील जि.प. सदस्य सारिका खवशी, असे तिघे शासकीय वाहनाने दिघी (होणाडे) गावालगत सायखेडा पुनर्वसन येथील अंगणवाडीत दुपारी पोहोचले. यावेळी विद्यार्थी होते. अंगणवाडी सेविकाही होती; पण सुविधांचा अभाव होता. सभापतींनी अंगणवाडी सेविकेला नमस्कार केला. ओळखले का मला, असा प्रश्न करताच अंगणवाडी सेविकेने ‘हो तुम्हाला ओळखले, तुम्ही तृप्तीताई पावडे आहात’, असे उत्तर दिले. या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला. कदाचित अंगणवाडी सेविकेला सभापती माहित नसेल म्हणून असे झाले, असे म्हणत या प्रकरणावर पडदा पडला; पण सभापतींना अंगणवाडी सेविका ओळखत नाही, हे उघड झाले. येथील अंगणवाडीत ९ वर्षांपूर्वीची पाणी पुरवठा समितीची यादी आढळली. चौकशीत ग्रामसेवकांनी ती उपलब्ध करून दिली नसल्याचे सांगितले. पाहणी केल्यानंतर मोर्चा रोहणा अंगणवाडीकडे वळला. यावेळी तेथे अंगणवाडी सेविका हजर होती तर मदतनिस गत दहा दिवसांपासून आलीच नसल्याचे समजले. याबाबत तक्रारही केल्याचे अंगणवाडी सेविका सांगत होत्या. फलकावर लिहिलेली तारीख पाहून सभापतींनी आजची तारीख विचारली असता तारीख लिहिण्याची आठवण राहिली नाही, असे सांगितले. तिसऱ्या अंगणवाडीला भेट दिली असता ती बंद होती. एका शिक्षिकेला विचारले असता माझी अंगणवाडी दुसरी आहे, असे उत्तर दिले. दिघीच्या अंगणवाडीची पाहणी केली असता भोंगळ कारभार समोर आला. यामुळे अंगणवाड्या किती सुसज्ज हे समोर आले.(वार्ताहर)एकही अंगणवाडी व्यवस्थित नसल्याचे वास्तवजि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे, सारिका खवशी यांनी शुक्रवारी रोहणा परिसरातील अंगणवाड्यांना भेटी देत पाहणी केली. या पाहणीमध्ये विदारक सत्य बाहेर आहे. परिसरातील एकही अंगणवाडी व्यवस्थित नव्हती. काही अंगणवाडी सेविका तर सभापतींनाही ओळखत नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे अंगणवाड्यांची घडी व्यवस्थित बसवावी लागणार असल्याचे मतही पाहणी केल्यानंतर मान्यवरांनी व्यक्त केले.