शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2015 01:59 IST

ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो.

परवाना नसतानाही मुलांकडे वाहने : पालकांचे दुर्लक्ष, पोलीसही असतात पैशाच्या शोधातवर्धा : ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो. परिणामी ग्रामीण भागात घडणाऱ्या अपघातांची पोलीस दप्तरी नोंद न होता असे प्रकरण मिटविले जाते. या वाहन चालकांमुळे सुरक्षीतता धोक्यात आली असून उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचे केवळ शहराकडे लक्ष असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागात आता प्रत्येक घरी दुचाकी आली. कुटुंबातील लहानात लहान मुलगा पालकांकडे वाहन चालविण्यासाठी हट्ट धरतो. त्याचा हट्ट पुरविण्यासाठी अनेक पालक मुलांच्या हातात दुचाकीची चावी देतात. यातून अनेकदा अपघात घडतात.पाचव्या वर्गात शिकणारा मुलगाही गावातून ‘फ्लॅश’ मारत सुसाट वेगाने दुचाकीने जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येते. सोबत आपल्या अप्रशिक्षित मित्रालाही गावातून, शाळेसमोरून जाण्यासाठी वाहन चालविण्यास सहकार्य करीत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आले आहेत. त्यापैकी बहुतांश चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. तरीही ते भरधाव वेगाने वाहन चालवितात. त्यात किरकोळ व गंभीर अपघात नेहमीच कुठे न कुठे घडतात. मात्र कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरिता जखमींना खासगी दवाखान्यात दाखल करून वाहन मालक-चालक जागीच तडजोड करून सुटका करवून घेतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात त्या अपघाताची नोंदच होत नाही.ग्रामीण भागात आता प्रत्येकाकडे दुचाकी आली. मात्र परवाना प्रत्येकाकडे नसतो. तरीही रस्त्याने वेडी-वाकडी वळणे घेत भरधाव वेगाने दुचाकी चालविली जाते. परिणामी अनेकदा अपघात घडतात. कधी सुसाट वेगाने जाणारेच एखाद्या अपघातात आपला जीवही गमावतात. या अप्रशिक्षित दुचाकीस्वारांमुळे जनावरेही जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. शाळकरी मुले, वृद्ध व पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. ग्रामीण रस्ते आता असुरक्षित बनले आहे. मात्र तरीही चालक परवाना तपासणीचे काम ग्रामीण भागात होत नाही. ग्रामीण भागातील काही ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी वसुलीपुरते फाट्यावर उभे राहून वाहन चालकांना अडवितात. त्यांच्याकडून पैसे वसूल करून सोडून दिले जाते. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले पोलिसांनाही न घाबरता पैसे देऊन आपली सुटका करवून घेतात. पोलिसांचा वाहतूक विभाग सांभाळतो. ग्रामीण भागात मात्र वाऱ्यावरच असतो. त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)