शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांना गुंगीचे औषध देत दानपेटी फोडली

By admin | Updated: July 7, 2015 01:37 IST

येथील टेकडीवर असलेल्या दर्ग्यातील सुरक्षा रक्षकांना शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन दानपेटी पळविल्याची खळबळजनका घटना सोमवारी सकाळी उघड झाली.

गिरड टेकडीवरील घटना: दीड लाख रुपये पळविलेगिरड : येथील टेकडीवर असलेल्या दर्ग्यातील सुरक्षा रक्षकांना शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन दानपेटी पळविल्याची खळबळजनका घटना सोमवारी सकाळी उघड झाली. या दानपेटीत समारे दीड लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी दर्ग्याच्या सुरक्षेत तैनात सीसीटिव्ही कॅमेरे व सेट टॉप बॉक्सही पळविला. या प्रकरणाची तक्रार गिरड ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपासाची सुत्रे फिरविली जात असून जाम, उमरेड व चिमूर मार्गावर नाकाबंदी केली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. मात्र पोलिसांना अद्याप काहीच गवसले नाही. प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तीन अज्ञात इसम दर्ग्याच्या टेकडीवर आले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना मार्ग हरवलो असून रात्रभराकरिता येथे विश्राम करावयाचा आहे, अशी विनंती केली. सुरक्षा रक्षकांनी ही विनंती मान्य करून रात्रभर मुक्काम करण्याची परवानगी दिली. दरम्यान, दर्ग्याचे पुजारी सैय्यद अयुब हे देखील आले. या तीन अज्ञात इसमांनी सगळ्यांना शीतपेय पिण्यासाठी दिले. शीतपेय पिताच सहाही जण गाढ झोपेत गेले. याचाच फायदा घेत चोरट्यांनी सैय्यद अयुब याच्यांकडील दानपेटीची चाबी घेवून दानपेटी उघडली. त्यातील अंदाजे एक लाख ४० हजार रुपये तसेच सिसीटिव्ही कॅमेरे घेवून पळ काढला. पहाटे ४ वाजताच्या सुमारास जाग आली असता त्यांना दानपेटी उघडी दिसली. त्यातील रोख लंपास होती. घटनेची माहिती त्यांनी गिरड पोलिसांना दिली. ठाणेदारासह पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. घटनास्थळाची पाहणी केली असता सिसी टिव्ही कॅमेरे व सेट टॉप बॉक्सही लंपास केल्याचे पाहणीत दिसून आले. तपासाची सुत्रे फिरवत जाम, उमरेड, चिमूर या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सदर तीन अज्ञात इसम स्कॉर्पिओ गाडीने आल्याची माहिती असून त्या दिशेने तपास सुरू आहे. दर्गाह कमिटीचे चेअरमेन करिमुद्दीन काजी यांनी घटनेची तक्रार गिरड पोलिसात दिली असून याप्रकरणी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)