शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेने निचांकी गाठताच कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच सुरुवातील आठ असलेल्या कोविड केअर सेंटरची संख्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तब्बल १७ करण्यात आली. शिवाय बहुतांश ठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. सध्यास्थितीत १७ कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे ३० डॉक्टर, ६० परिचारिका ७० वॉर्डबॉय सेवा देत आहेत.

ठळक मुद्देसीसीसीत ३६ रुग्ण : कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या १७ कोविड केअर सेंटर कार्यरत असून त्या ठिकाणी तब्बल एक हजार आठ रुग्ण खाटांची व्यवस्था आहे. परंतु, सध्या कोविडच्या दुसरी लाट निच्चांकीवर स्थिरावल्याने सध्यास्थितीत कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ३६ ॲक्टिव्ह कोविड बाधित असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याची भीती संचारल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच सुरुवातील आठ असलेल्या कोविड केअर सेंटरची संख्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तब्बल १७ करण्यात आली. शिवाय बहुतांश ठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. सध्यास्थितीत १७ कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे ३० डॉक्टर, ६० परिचारिका ७० वॉर्डबॉय सेवा देत आहेत. परंतु, नवीन कोविड बाधित सापडण्याची संख्या रोडावल्याने तसेच कोविड केअर सेंटरमध्ये मोजकेच ॲक्टिव्ह कोविड बाधित असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरी जाण्याच्या भीतीने घर केले आहे. सध्यास्थितीत एकही कोविड केअर सेंटर बंद करण्यासह कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्याला कमी करण्यात आले नसले तरी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने आरोग्य सेवेत कायम करावे, अशी मागणी आहे. 

सीसीसीमध्ये मिळते गुणवत्तापूर्ण भोजन- जिल्ह्यात एकूण १७ कोविड केअर सेंटर असून तेथे उत्तम गुणवत्तेचे जेवण ॲक्टिव्ह कोविड बाधितांना दिले जाते.- ज्या ॲक्टिव्ह कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी वेगळी व्यवस्था नाही अशांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. - कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या प्रत्येक ॲक्टिव्ह कोविड बाधिताची दररोज आरोग्य तपासणी केली जाते.- प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच कोविड बाधिताला तातडीने कोविड केअर सेंटरमधून कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. 

प्रत्येक कर्मचाऱ्याला विमा कवच- शासनाच्या नियमानुसार कोविड केअर सेंटरमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला विम्याचे कवच देण्यात आले आहे. 

जिल्ह्यात एकूण १७ कोविड केअर सेंटर असून तेथे दाखल प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे. या ठिकाणी दररोज रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाते. कोविड केअर सेंटरमध्येच चांगल्या गुणवत्तेचे जेवण रुग्णांना दिले जाते. - डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला नियमित वेतन मिळाले पाहिजे. शिवाय शासनाने आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित केले पाहिजे, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या