शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वर्धेतील दुसऱ्या सभेने दिली काँग्रेस कार्यकर्त्यांना उर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:41 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची मंगळवारी पार पडलेली वर्ध्यातील ही दुसरी सभा होती. यापूर्वी सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची स्थानिक जुन्या आरटीओ मैदानावर जाहीर सभा पार पडली होती.

ठळक मुद्देभाजपासह संघाचाही घेतला नेत्यांनी खरपूस समाचार : सभेनंतर राहुल गांधींच्या भाषणाची ठिकठिकाणी रंगली चर्चा

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची मंगळवारी पार पडलेली वर्ध्यातील ही दुसरी सभा होती. यापूर्वी सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची स्थानिक जुन्या आरटीओ मैदानावर जाहीर सभा पार पडली होती. त्यावेळच्या तूलनेत यंदाच्या जाहीर सभेला खा. राहुल गांधी यांच्यासह दिग्गजांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यंदा राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गजांनी सर्कस मैदान येथील व्यासपीठावरून केलेले मार्गदर्शन काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना नवी उर्जा देणारेच ठरले आहे. रात्री उशीरापर्यंत ठिकठिकाणी राहुल गांधींच्या भाषणाची चर्चा होत होती.पदाधिकाऱ्यांनी आॅटोरिक्षातून धरला रस्ताकाँग्रेसच्या पदयात्रेदरम्यान एकच गर्दी झाल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. यादरम्यान काही नेत्यांनी सभास्थळापर्यंत पोहचण्यासाठी आॅटोरिक्षा आधार घेतल्याचे याची देही याची डोळा नागरिकांनी बघितले. तर काहींनी परतीचा प्रवास सायकलरिक्षाने केला.शहरातील गल्लीबोळात वाहनतळराज्यभरातून कार्यकर्त्यांचे वाहने मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते; पण ही वाहने मिळेल त्या गल्ली-बोळात उभी केल्याने अनेक रस्त्यांना वाहनतळाचे स्वरुप आले होते. रामनगरात जाहीर सभा असल्याने या परिसरातील गल्ल्या व रस्ते वाहनामुळे गजबजून गेले होते. बॅचलर रोडवरही वाहनांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राहिल्याने सायंकाळी उशिरापर्यंत या मार्गावर वाहतुकीची कोडी कायम होती.नेते पुढे-पुढे कार्यकर्ते मागे-मागेखासदार राहुल गांधी यांची पदयात्रा महात्मा गांधी पुतळ्यापासून निघणार असल्याची माहिती देण्यात आल्याने राज्यभरातून आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी तेथे दाखल झाले होते; पण वेळेचा विचार करुन ही पदयात्रा इतवारा परिसरातून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. खा.गांधी हे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरूवातीला वाहनात बसून पुढे गेले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन पदयात्रेत सहभागी होत सर्कस मैदानापर्यंत पायी आले. परंतू सर्वच नेते वाहनातून पुढे निघून गेल्याने कार्यकर्ते मात्र धावपळ करीत त्यांच्या मागे निघाले. काहींनी इतवारापरिसर गाठला तर काहींनी मिळेल तो मार्ग पकडून सर्कस मैदानाचा मार्ग धरला. यात बहूतांश कार्यकर्त्यांना सभेचे ठिकाणच माहिती नसल्याने शहरातच घिरट्या घालत राहीले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSewagramसेवाग्राम