शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

बसेसला भोंदूबाबांच्या जाहिरातींचे आच्छादन

By admin | Updated: September 30, 2015 05:44 IST

अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू केला; पण अनेक भोंदुबाबा समस्या दूर

वर्धा : अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू केला; पण अनेक भोंदुबाबा समस्या दूर करण्याच्या नावाखाली नागरिकांना फसवू पाहत आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्याचे बसेसमध्ये सर्वत्र चिपकवून असलेल्या पत्रकांवरून दिसून येते. दैनंदिन जीवनातील दगदग आणि अडचणींमुळे सामान्य नागरिक वैतागलेले असतात. आपली समस्या दूर व्हावी, अशी त्यांची स्वाभाविक अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्या अवस्थेचा आणि श्रद्धेचा उपयोग करीत या समस्या जादूटोण्याद्वारे सोडविण्याचा दावा करणारे अनेक भामटे सर्वत्र आपली दुकाने मांडून बसली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायद्याचा वचक निर्माण करण्यात आला आहे; पण त्यालाही न जुमानता चुटकीसरशी कोणतीही समस्या दूर करण्याचा दावा करण्याच्या जाहिराती केल्या जात आहे. एसटी बसेसमध्ये सामान्य नागरिक प्रवास करीत असतात. यातील बरेच नागरिकही भोळसट असतात. त्यांच्या याच भोळेपणाचा फायदा घेत अशा भोंदूबाबांद्वारे बसेसमध्ये जाहिराती लावल्या जात आहेत. काही काळात त्याचे प्रमाण वाढून संपूर्ण बसेसच जाहिरातींना आच्छादून गेल्याचे दिसते. ही बाब शहरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास येताच त्यांनी ही पत्रके काढून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आणून दिले. या प्रकारावर आळा घालत भोंदूबाबांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.(शहर प्रतिनिधी)४बहुतेक नागरिक हे दैनंदिन कटकटी आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त असतात. यातील अनेक युवक हे बेरोजगारीनेही त्रस्त असतात. अशावेळी सदर पोस्टर्स नजरेस पडल्यास त्याकडे ओढा वाढून त्यावर दिलेल्या क्रमांकावर फोन करून जाळ्यात ओढले जाते. बरेचदा असे भोंदूबाबा त्यांना वेगवेगळ्या शहरात बोलवून लुबाडत असल्याचेही ऐकिवात आहे. देशभर जाळे सक्रिय४महामंडळाच्या बसेस या राज्यासह देशातील इतरही राज्यांत धावत असतात. त्यामुळे ही पोस्टर्स बसेसमध्ये लावल्यास ती देशभर पोहोचतात. यातील जाहिरातींवर कुठेही नाव आणि पत्ता न देता ठळक अक्षरात मोबाईल क्रमांक दिलेला असतो. तो क्रमांकही इतर राज्यातला असल्याचे निदर्शनास येते.किळस आणणाऱ्या जाहिराती४यातील काही जाहिराती तर किळस आणणाऱ्या आहेत. तुमच्या शत्रूला काही वेळातच संपविण्याचा दावा करण्यात येत असल्याचा ओंगळवाणा प्रकारही पाहावयास मिळतो. त्यामुळे अंधश्रद्धेचा फास अद्यापही घट्टच असल्याचे प्रत्ययास येते.महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष ४केवळ एकाच आगाराच्या बसेसमध्ये सदर फसवणुकीच्या जाहिराती लावलेल्या नाहीत तर राज्यातील सर्वच आगाराच्या प्रत्येक बसेसमध्ये एक तरी पोस्टर पाहावयास मिळते. एवढेच नव्हे तर इतरही अश्लील जाहिरातींचा बसेसमध्ये भरणा असतो. याकडे सर्वच आगारांचे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिक संताप व्यक्त करीत आहे.