शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आगीमुळे कंटेनर होताहेत भंगार

By admin | Updated: November 8, 2014 01:37 IST

कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने वस्तीने कंटेनर ठेवण्यात आले आहे.

वर्धा : कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने वस्तीने कंटेनर ठेवण्यात आले आहे. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच आग लावली जाते. या कारणाने शहर परिसरातील सर्वच कंटेनर भंगार झाले आहेत़ तसेच हा ही आग अनेक दिवस सुरू रहात असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून श्वसनाचे आजार वाढले आहेत़ शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे वतीने ठिकठिकाणी कंटेनर ठेवले आहेत. स्वच्छता कर्मचारीही या कामासाठी नेमले आहेत. काही नागरिक कचरा कंटेनरमध्ये जमा करतात तर अनेक जण कंटेनरच्या बाजूलाच कचरा फेकण्यात धन्यता मानतात. भरलेल्या कंटेनरमधील कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाही अनेकदा या कंटेनरमध्येच आग लावण्यात येते. हा प्रकार शहरातील बहुतेक ठिकाणी होत असल्याने जवळपास सर्वच कंटेनरला दिलेला पिवळा रंग जळून कंटेनर जंगून भंगार होत चालले आहे. त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत असतानाही याकडे दुर्र्लक्ष होत आहे.शहरी कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे राहते़ प्लास्टिकचा कचऱ्याचे विघटन होत नाही़ त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते़ त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे़ कंटेनरच्या चारही बाजुला घरे राहतात़ अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरतो़ अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणे कठीण होऊन बसते़ प्लास्टिकसारख्या घातक पदार्थ्यांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे नागरिक ही आग आम्ही लावत नसल्याचे गळा ओरडून सांगत प्रशासनाकडे बोट दाखवतात तर परिषदेचे कर्मचारी नागरिकांकडे बोट राखवितात. त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही़कंटेनरच्या आसपासच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यावर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ नगर परिषद प्रशासनाने काही वर्षाम्पूर्वी कंटेनर खरेदी करण्यात आले. प्रत्येक कंटेनर जवळपास १० हजार रूपयांचा असून त्याचे किमान आयुष्य आठ वर्ष आहे़ मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे एक वर्षातच सदर कंटेनर भंगार झाले आहेत़ भंगार कंटेनर व्यवस्थित उचलला जात नसल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे़ लावलेली आग अनेक दिवस तशीच सुरू राहते. अशा वेळी अन्नाच्या शोधात कुत्रे, बकरी अशी जनावरे त्यात पडल्यास जीवानिशी जातात. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.