लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आलेले कृषी साहित्य भंगारात धुळखात पडून आहे. या यंत्राचा शेतकºयांना कवडीचाही फायदा झाला नसून मळणी यंत्र, ट्रॅक्टर व इतर साहित्य भंगार झाल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले.या मळणी यंत्रणासह ट्रॅक्टर व इतर साहित्यही तेथे पडून आहे. शासनाने हे निरूपयोगी साहित्य भंगारात विकण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे साहित्य उघडयावर भंगारस्थितीत पडून आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन भंगार विकल्यास या परिसराला मोकळा श्वास घेता येईल. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजतालुका कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत नव्याने बांधण्यासाठी यापूर्वी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ते काम पूर्णत्त्वास गेले नाही. इमारत बांधकामासाठी मोठ्या निधीची गरज आहे. संपूर्ण तालुक्याचा कार्यभार पाहणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यालयाची सर्व सोयीनियुक्त सुसज्ज इमारत बांधण्याची आवश्यकता आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधीने सामुहिकपणे सकारात्मक प्रयत्न केल्यास ही इमारत लवकरच बांधण्यात येऊ शकते.तालुक्याचा कारभार तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून चालतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी ही इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीची गरज आहे. पण, इमारत जुनी असली तरी आमचे कामकाज नियमीत सुरू आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही विकासात्मक योजनांची त्यांना माहिती देत असतो.- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू.
शेतकऱ्यांसाठी आलेल्या मळणी यंत्रासह कृषी साहित्य भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST
शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले. या मळणी यंत्रणासह ट्रॅक्टर व इतर साहित्यही तेथे पडून आहे. शासनाने हे निरूपयोगी साहित्य भंगारात विकण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे साहित्य उघडयावर भंगारस्थितीत पडून आहे.
शेतकऱ्यांसाठी आलेल्या मळणी यंत्रासह कृषी साहित्य भंगारात
ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकार