शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

विज्ञानाने जग जोडले, पण माणूस नाही

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

महात्मा गांधी व विनोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गीताई मंदिरात पुज्य विनोबाजींनी गीताई मंदिराचे उद्घाटन केले. ३४ वर्षांपासून सातत्याने ही परंपरा सुरू आहे. ३५ व्या वर्धापन दिनाच्या

रामचंद्र देखणे : गीताई मंदिराचा वर्धापन दिनवर्धा : महात्मा गांधी व विनोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गीताई मंदिरात पुज्य विनोबाजींनी गीताई मंदिराचे उद्घाटन केले. ३४ वर्षांपासून सातत्याने ही परंपरा सुरू आहे. ३५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हजारो मुलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी संत साहित्याचे व्यासंगी पुणे येथील विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी गांधी विचार परिषदेचे निदेशक भरत महोदय होते.यावेळी डॉ. देखणे म्हणाले, माणसाला चंद्र, मंगळावर जाता आले व विज्ञानाने संपूर्ण जग जोडता येते हे सिद्ध झाले; परंतु माणूस अजूनही जोडता आला नाही. याची खंत व्यक्त करून अध्यात्म व शिक्षणामुळे माणूस जोडण्याकरिता आपण कमी पडतो. याला अनुसरून एक उदाहरण आपल्या भाषणातून मुलांना सांगताना डॉ. देखणे म्हणाले, मुलाला वडिलांनी जगाच्या नकाशाचे चित्र दिले व त्याचा सखोल अभ्यास करावयास सांगितले. मुलाने खूप प्रयत्न केला परंतु शेवटी कंटाळून नकाशा फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकला. वडिलांनी, नकाशाच्या अभ्यासाविषयी विचारले असता त्यांना उत्तर न देता फाडलेल्या नकाशाचे तुकडे त्यांच्यापुढे ठेवले, वडिलांनी रागावून तो संपूर्ण नकाशा व्यवस्थित करण्यास सांगितले. मुलाने प्रयत्न करून नकाशाच्या पाठीमागे असलेल्या एका आकृतीला जुळवून नकाशा पूर्वीसारखा वडीलांसमोर ठेवला. वडीलांनी विचारले नकाशा फाडल्यानंतर हे कसे शक्य झाले? मुलगा म्हणाला मी नकाशाच्या मागे चित्रित असलेला माणूस जोडला त्यामुळे जगाचा नकाशा सहजच तयार झाला. अशा पे्ररणादायी गोष्टीतून मार्गदर्शन केले. गीतेची निर्मिती ही विनोबाजीचे वास्तव्य धुळ्याच्या तुरुंगात असताना झाली. जमनालाल बजाज, ऋषभदास राका यांच्या आग्रहानी विनोबाजी प्रवचन करीत असत. त्यांचे १८ प्रवचन मातृहृदयी साने गुरूजींनी अक्षर नी अक्षर लिहून काढले. ही गीतेवरील विनोबांची सर्वोत्कृष्ट कृती आहे. वर्धा शहरातील गीताई मंदिर हे एक वैशिष्टपूर्ण मंदिर आहे.वर्षभर गीताईच्या कार्यात सहभागी शिक्षक व शिक्षिकाचा सूतमाला, शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. यात यशवंत विद्यालय सेवाग्रामचे सुदाम लांबट, महिलाश्रम बुनियादीच्या संध्या केवलिया, दुष्यंत कांबळे, रत्नीबाई विद्यालयाच्या सुषमा पाखरे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य विजय व्यास, कस्तुरबा विद्यामंदिर सेवाग्राम येथील लक्ष्मी रेड्डी, सुशील हिंमतसिंगका विद्यालयाच्या ज्योती कुटे, कस्तुरबा विद्यालय, कारंजाच्या इंदिरा काळभूत, मांडव्याच्या बेबीताई पेटकर आदींचा समावेश आहे. संयोजक प्राचार्य अशोक मेहरे यांनी प्रास्ताविक केले.(स्थानिक प्रतिनिधी)