शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सेवाग्रामात शाळेचा रस्ता हरविला चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:04 IST

ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ते सनशाईन शाळा मार्गावर संपूर्ण चिखल झाल्याने, खड्डे पडले रहिवाश्यासह विद्यार्थ्यांना येणे जाणे कठीण झाले आहे. डांबरी मार्ग चिखलात हरविल्याने नागरिक संतप्त आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची पायपीट : पेट्रोल पंप ते सनशाईन शाळा मार्गाची अवस्था दयनीय

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ते सनशाईन शाळा मार्गावर संपूर्ण चिखल झाल्याने, खड्डे पडले रहिवाश्यासह विद्यार्थ्यांना येणे जाणे कठीण झाले आहे. डांबरी मार्ग चिखलात हरविल्याने नागरिक संतप्त आहेत.सेवाग्राम वर्धा मार्गावर आदर्श नगर परिसर असून पेट्रोलपंपा समोरून सनशाईन शाळेकडे मार्ग गेलेला आहे.आदर्श नगरवासियांना तसेच आय.टी.पार्कचे एक प्रवेश व्दार या मार्गावर आहे.या भागाचा आता विस्तार होत असून आय.टी.पार्क मुळे या भागाचे महत्त्व वाढले आहेत. पण हा संपूर्ण भाग आदर्श नगर प्रभाग तीन मध्ये मोडल्या जातो.विस्तार होत आहे आणि महत्व पण वाढत असले तरी मूलभूत सुविधा देण्यास ग्रा.पं. प्रशासन अपयशी ठरले आहे.२०१४मध्ये विकासाचे स्वप्न जनतेने पाहिले होते.पण इतक्या वर्षात आदर्श नगर वासियांच्या नशिबी काहीच आले नाही.शाळा आणि निवासस्थाना मुळे या मार्गावर आवागमन वाढले आहे.या डांबर रोडवरील खड्डे आणि चिखला मुळे जाने येणे कठीण झाले.पावसामुळे घसरण्याचे प्रमाण वाढले. सायकल,दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.बहुसंख्य रहिवासी आणि विद्याथी पायदळ किंवा सायकलने या मार्गाने मार्गक्रमन करीत असतात.पावसाने मार्गांची वाट लावल्याने लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या मार्गाची तत्काळ दुरस्ती करावी अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.बापूच्या भूमीत केवळ आराखड्यासाठी निधीराष्ट्रपिता महात्मा गांधीची कर्मभूमी असलेल्या सेवाग्रामच्या विकासाकरिता आराखड्यात निधी मंजूर करण्यात आला. यातून आश्रम परिसराचा विकास होणार आहे. सेवाग्रामवासीयाच्या नशीबी मात्र नरक यातनाच आहे. गावाचा विस्तार झपाट्याने होत असताना नागरी सुविधेसाठी मात्र पैसा आलेला नाही.२०१६-१७ मध्ये सिमेंट रोड मंजूर झाला आहे. आणि कामाचा करारनामा २०१८ मध्ये झालेला आहे. रोड कामाला प्रारंभ होणे अपेक्षित आहे.-संजय गवळी, उपसरपंच ग्रा.पं.सेवाग्राम.