तालुकास्तरीय मेळावा : राज्यस्तरीय अधिवेशनाची दिली माहितीवर्धा : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे राज्य अधिवेशन वर्धा येथे आयोजित केले आहे. यानिमित्त विविध तालुक्यात मेळावे घेण्यात येत आहे. देवळी, वर्धा, आर्वी, आष्टी येथील मेळाव्याला शेकडोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र सुरकार यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले. ज्या कर्मचाऱ्यांना अल्प मानधन मिळते त्यांच्यासाठी कोणी लढा देत नाही, मात्र कामगारांना न्याय मिळावा यासाठी आयटक सातत्याने प्रयत्न करते. न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी आपली संघटना मजबूत करा, असेही आवाहन सुरकार यांनी यावेळी केले.शासनाची भूमिका व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे प्रश्न या बाबत सविस्तर मार्गदर्शन आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी केले. तर जयमाला बेलगे, शांता गुजराती सीमा गढिया, ज्योती फुसाटे, पुष्पा भगत, अरुणा गावंडे, वैशाली ठावरे असलम पठाण, लता कौरती, बंडु बैलगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.तालुका मेळाव्यात स्थानिक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. अधिवेशनाचा खर्चावर आर्थिक मदत मागण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन वर्षांकरीता तालुका कार्यकारणीची सवार्नुमते निवड करण्यात आली. यात देवळी तालुका अध्यक्षपदी गीता थुल, कार्याध्यक्षपदी रेखा कोथळकर, उपाध्यक्षपदी वैशाली काळपांडे, माधूरी पंधरे, सचिव लता कौरती, सहसचिव ज्योती वाढवे, अंबिका कोसपटे, कोषाध्यक्षपदी निर्मला नागोसे, संघटकपदी भाऊराव थुल, जिजा कैकाडे, विजया मडावी, प्रमिला दाढे, दया पोपटकर, निलकठ रिठे, आशा कांबळे, मंगला श्रीरामे यांचा समावेश आहे. तसेच आर्वी तालुका अध्यक्षपदी सुमन उईके, कार्याध्यक्ष शांता गुजराती, उपाध्यक्ष रेखा गाडेकर, सुनिता बागडकर, सचिवपदी सुरेखा भगत, सहसचिवपदी पुष्पा मुत्तेवार, वनिता फाटे, कोषाध्यक्षपदी प्रमिला गिर्हे, संघटक बंडु बेलगे यांची निवड केली. राज्य अधिवेशन तयारीची जिल्हा बैठक घेण्याबाबत या मेळाव्यात सूचना करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)
शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा मेळावा
By admin | Updated: October 27, 2016 00:53 IST