शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला सुट्ट्या...मोबाईलवर शाळा भरणार असे मॅडमने सांगितलेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

ऊसतोड एप्रिलपर्यंत चालत असल्याने त्या कालावधीत मुलांची शाळाही बंद होते. अशावेळेस त्यांच्या शिक्षणाचे काय? ज्या शाळेत ही मुल असतात त्या शाळेतील शिक्षकांनी अशांची माहिती शासनास किंवा संबंधित शिक्षण विभागास देणे गरजेचे आहे. हजेरीपटावर त्यांना हजर दाखवून जबाबदारी शिक्षकांकडून झटकली तर जात नाही ना, असा संशय येतो. शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी फक्त गावात, शहरात शोध मोहिम राबविली जाते. शेत शिवार, तांडे मात्र या शोधमोहिमेपासून वंचित असतात.

ठळक मुद्देशेत शिवार, तांडे येथे शाळाबाह्य मुले जास्त : वस्ती शाळेच्या नियोजनाची गरज

श्रीकांत तोटेलोकमत न्यूज नेटवर्कपवनार : अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या चार मुलभूत गरजा सर्व शिक्षण अभियानांतर्गत सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक शेत शिवार, तांडे येथे बाहेर जिल्ह्यातून दाखल झालेले ऊसतोड कामगारांचे कुटुंब मुलाबाळांसह आले आहे. त्यामुळे त्यांची मुले शाळाबाह्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामगारच्या मुलांना विचारले असता सध्या शाळेला सुट्ट्या असून अभ्यासही नाही. पण, मोबाईलवर शाळा भरणार असल्याचे मॅडमने आम्हाला सांगितलेच नाही, असे सांगितले. त्यामुळे ही मुले देखील शिक्षणापासून वंचित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वस्ती शाळेच्या नियोजनाची गरज आहे.जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमाेहीम सुरू असून एकही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, उस तोडणीसाठी यवतमाळ, पुसद, दारव्हा, दिग्रस, बिड येथील उसतोड कामगार दरवर्षी मुलाबाळांसह येतात ज्याच्या शेतातील ऊस तोडायचा आहे त्याच्याच शेतात झोपडी उभी करून समुहाने राहतात. त्यांच्या ठेकेदाराने त्यांना आगाऊ पैसे देऊन आणलेले असते. दिवाळीनंतर हे कामगार येत असल्याने त्यांची मुलबाळं शाळेपासून वंचित राहतात. ऊसतोड एप्रिलपर्यंत चालत असल्याने त्या कालावधीत मुलांची शाळाही बंद होते. अशावेळेस त्यांच्या शिक्षणाचे काय? ज्या शाळेत ही मुल असतात त्या शाळेतील शिक्षकांनी अशांची माहिती शासनास किंवा संबंधित शिक्षण विभागास देणे गरजेचे आहे. हजेरीपटावर त्यांना हजर दाखवून जबाबदारी शिक्षकांकडून झटकली तर जात नाही ना, असा संशय येतो. शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी फक्त गावात, शहरात शोध मोहिम राबविली जाते. शेत शिवार, तांडे मात्र या शोधमोहिमेपासून वंचित असतात. इथेच मात्र दुर्देवाने शाळा बाह्य विद्यार्थी संख्या मोठी असते.महागाव तालुक्यातील शिवानी निरंजन खंडारे (११), योगेश खंडारे (७), सोहम सुनिल रंगारी (८) हे तेथील जि.प. शाळेतील विद्यार्थी सध्या आई वडिलांसोबत सुरगाव शिवारातील उसाच्या शेतातील झोपडीत राहतात. चार महिन्यापासून ते इकडे असल्याने त्यांचा शाळेशी, ऑनलाईन शिक्षणाशी व पर्यायाने पुस्तकाशी संपर्क तुटला आहे. त्यांच्या शिक्षणाची कशी व्यवस्था होईल हे बघणे गरजेचे आहे.

जोडीला ५० हजार रूपये ॲडव्हॉन्स मिळतो. आमच्या भागात दिवाळीनंतर कामे नसल्याने आम्ही ऊस तोडणीसाठी येतो. कोरोनामुळे शाळा बंद आहे. ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. पोटासाठी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.- निरंजन खंडारे, ऊसतोड कामगार, रा. साई, जि. यवतमाळ.

मागील वर्षी मी पाचव्या वर्गात होते. यावर्षी तर शाळाच सुरू झाल्या नाही. पुस्तकेही मिळाली नाही. यावर्षी शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे अभ्यासही नाही. मात्र, मोबाईलवर शाळा भरणार असल्याचे आमच्या मॅडमने आम्हाला सांगितलेच नाही.- शिवानी खंडारे, विद्यार्थिनी रा. साई,जि. यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेतीSchoolशाळा