शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय मैदान बनले मद्यपींचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:12 IST

शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

ठळक मुद्देपोलिसांचे अभय : विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. शाळा सुटल्यावर हमदापूर येथील शाळेचे मैदान मद्यपींचा ठिय्या बनले असते. शिक्षकांनी वारंवार तक्रार करूनही या मद्यपींचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश आले.हमदापूर ही परिसरातील गावांची मुख्य बाजारपेठ आहे. शाळेचे येथे मोठे मैदान असून रस्त्याच्या बाजूलाच चहा, नाश्ताच्या टपऱ्या आहेत. येथे प्रवाशांची कायम गर्दी असते. शाळेचे मैदान सुद्धा दिवसा व सायंकाळी विद्यार्थी व खेळाडूंनी भरलेले असते. सायंकाळी खेळाडूंचा सराव झाल्यानंतर मैदान रिकामे होते. यानंतर आंबटशौकीनांचा येथे ठिय्या असतो. थंडीच्या काळात तर मद्यपींची येथे मैफल रंगते. मद्य रिचविल्यानंतर वस्तू उचलून ठेवण्याचे भान सुद्धा त्यांना नसते. दुसऱ्या दिवशी मात्र विद्यार्थ्यांची पंचाईत होते. ठिकठिकाणी रिकामे पॅकेट्स, कागद, शिश्या, प्लास्टिक ग्लास पडून असतात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक या वस्तुंचा परिचय होतो. त्यांचा जिज्ञासा वाढताना दिसते, बरेचदा काचाच्या शिश्या फुटलेल्या असतात. त्यामुळे खेळताना विद्यार्थी जखमी होण्याचा धोका असतो. खेळाडूंना अनेकदा काचेचे तुकडे उचलावे लागतात.शाळेत शिक्षण, खेळ, कला याचे ज्ञान मिळावे मात्र मैदानावरील हा प्रकार त्यांना बालवयातच वाममार्गाला लावणारा ठरतो अशी तक्रार पालक करतात. यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसते.विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीतीशाळा, महाविद्यालयांमध्ये सध्या व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात असले तरी विद्येचे मंदिर असे संबोधल्या जाणाऱ्या शाळा परिसराच सध्या काही समाजकंटक दारू ढोसण्यासाठी बसत असल्याने व दारूच्या रिकाम्या शिश्या व इतर साहित्य तेथेच टाकून जात असल्याने विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीती बळावत आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचे सुजान नागरिक असल्याने त्यांच्यावर कुठलेही वाईट संस्कार होऊ नयेत या हेतूने सुजान ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा परिसरात दारूपिणाऱ्या मद्यपींना धडा शिकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिवाय गावातील लोकप्रतिनिधींनीही एकत्र येत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.