वर्धा : स्थानिक गजानननगर येथील रवींद्र साटोटे (४०) याने गांधी ज्ञान मंदिर परिसरातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. घटनास्थळी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत शाळेच्या कामकाजाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो जगजीवनराम शाळेत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहे.
शाळेच्या कर्मचाऱ्याची विहिरीत आत्महत्या
By admin | Updated: August 1, 2015 02:29 IST