शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या विकासाचे समाधान

By admin | Updated: May 26, 2017 00:59 IST

जीबीएमएम या शाळेचा दैदिप्यमान इतिहास आहे. या शाळेचे विध्यार्थी देश-विदेशात शहराचा लौकिक वाढवित आहे.

समीर कुणावार : शाळेला मिळणार नवी इमारतलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जीबीएमएम या शाळेचा दैदिप्यमान इतिहास आहे. या शाळेचे विध्यार्थी देश-विदेशात शहराचा लौकिक वाढवित आहे. शहरातील नागरिकांना या शाळेबद्धल नितांत आदर आहे. शाळेची इमारत जीर्ण झाल्याने त्या जागेवर नवीन इमारत उभारून या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, हे माझे ध्येय होते. आता या शाळेची जीर्ण इमारत पाडून तेथे त्याच तोडीची ८ कोटी १५ लाख रुपये खर्चून नवीन इमारत उभी राहणार आहे. ध्येयपूर्तीचे समाधान माजी विद्यार्थी म्हणून मिळणार आहे, असे मत आ. समीर कुणावार यांनी व्यक्त केले.नगर परिषदेद्वारे संचालित जीबीएमएम शाळेच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरूवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प. उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, पं.स. सभापती गंगाधर कोळे, न.प. बांधकाम सभापती शुभांगी डोंगरे, शिक्षण सभापती रविला आखाडे, नगरसेवक रमेश धारकर, मुख्याधिकारी अनिल जगताप, भाजपचे भूपेंद्र शहाणे उपस्थित होते. आ. कुणावार यांनी मागील दोन वर्षांत शहरात आणलेल्या २०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची माहिती दिली. येत्या काळात शहरातील एकही काम अर्धवट राहणार नाही, असे प्रयत्न करणार आहे. जीबीएमएमला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक परिश्रम घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मी आमदार म्हणून काम करीत असताना माझे गाव व जनतेचे ऋण फेडायचे, या भावनेने काम करीत आहे. कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खा. तडस यांनी आ. कुणावार यांच्या कार्यकाळाचा गौरव करताना महाराष्ट्रात कोणत्याही न.प. मध्ये झाली नाही एवढी कामे होत आहे. फडणवीस शासनाच्या कार्यकाळात विदर्भात विकास कामाचे चांगले दिवस आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जीबीएमएम शाळेचे माजी विध्यार्थी व सध्या न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती राजेश तिवारी, न्या. आकाश वाशीमकर, न्या. दीपक भोला यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. चंद्रकांत देशपांडे, अ‍ॅड रवी मद्दलवार, अ‍ॅड. स्वप्नील धारकर, माजी आमदार डॉ. वसंत बोंडे, माजी प्राचार्य अमृत लोणारे, हरबनसिंग तिवारी, डोंगरवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.