शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शाळा झाली कंत्राटदाराचे गोदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:12 IST

स्थानिक स्टेशन फैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळा परिसरात कंत्राटदाराच्यावतीने मनमर्जीने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालिका कर्मचाºयांचे दुर्लक्ष : शिवाजी प्राथमिक शाळा परिसरातील प्रकार

ंलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक स्टेशन फैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळा परिसरात कंत्राटदाराच्यावतीने मनमर्जीने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. याचा शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. न. प. ची शाळा कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे व त्याकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदाराचे गोदाम होऊ पाहत असल्याने परिसरातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी आहे.शहरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, त्यासाठी लागणारे मोठाले प्लास्टिक व लोखंडी पाईप कंत्राटदाराच्यावतीने स्टेशन फैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळेच्या आवारात टाकण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. परिमाणी, खेळाडूवृत्तीला खो मिळत आहे. शाळा परिसरात टाकण्यात आलेले साहित्य एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारे ठरत आहे. काही नागरिकांनी शाळा परिसरातील साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींसह पालिका कर्मचाºयांना माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडूनही दुर्लक्षच करण्यात आल्याची परिसरात ओरड आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा न.प.च्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.साचलेल्या पाण्याच्या डबक्यात तयार होतात डासजलकुंभाचा पाईप लिकेज असल्याने शाळा परिसरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे. त्यात डासांची दिवसेंदिवस निर्मितीही होत असून हा प्रकार किटकजन्य आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. शिवाय जलकुंभाजवळ तयार करण्यात आलेल्या टाक्यावरील सिमेंटचे झाकण तुटले आहे. त्याच्या दुरूस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देत आहे. त्याची त्वरित दुरूस्ती गरजेची आहे.लिकेजमुळे होतोय पाण्याचा अपव्ययस्टेशनफैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळेच्या आवारात जलकुंभ आहे. परंतु, जलकुंभाचा पाईप लिक असल्याने व त्याच्या दुरूस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सदर लिकेजची तात्काळ दुरूस्ती गरजेची आहे.शाळा परिसरात ठेवण्यात आलेल्या साहित्याबाबत अद्याप कुणाचीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कार्यवाही करण्यात येईल.- एन. आर. नंदनवार सहाय्यक अभियंता, न. प. वर्धा.