शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, आयटीआयसमोरच वाहतात दारूचे पाट

By admin | Updated: August 26, 2014 23:39 IST

निकोप, बुद्धिसंपन्न व संस्कारशील शिक्षण देणारे पवित्रमय विद्या मंदिर म्हणजे शाळा होय़ येथील ललिताबाई मुरारका कन्या शाळा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शहरातील अन्य

पुलगाव : निकोप, बुद्धिसंपन्न व संस्कारशील शिक्षण देणारे पवित्रमय विद्या मंदिर म्हणजे शाळा होय़ येथील ललिताबाई मुरारका कन्या शाळा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शहरातील अन्य पालिकांच्या शाळांसमोरच दारूचे पाट वाहताना दिसतात़ खुलेआम सुरू असलेले हे दारूचे अड्डे बंद करण्याकरिता कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसते़ यामुळे शहरात मद्यपिंचे ‘रोड शो’ नित्याचीच बाब झाली आहे़ पोलिसांनी याकडे लक्ष देत शहरातील दारूविक्रेत्यांना आवर घालावा, अशी मागणी होत आहे़दारूबंदी असलेल्या वर्धेतील अमरावती जिल्ह्याला लागून असलेल्या पुलगाव शहरात दारूची कमी नाही़ नदी ओलांडली की अधिकृत दारूविक्रीचा परवाना असलेले बियरबार आढळून येतात़ असे असताना शहरातही मोठ्या प्रमाणात दारूचे वाट वाहताना दिसतात़ शहरातील कित्येक शाळांच्या परिसरातच दारूविक्रेते आपले अवैध व्यवसाय चालवीत असल्याचे दिसते़ भीमनगर परिसरातील शाळा परिसरात सहज दारू उपलब्ध होते़ शिवाय नगर िपरिषद हायस्कूलजवळही दारू मिळते़ यानंतर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या ललिताबाई मुरारका व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कुंपण भिंतीजवळ सर्रास दारूविक्री केली जाते़ शिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या परिसरात खुलेआम दारूविक्री केली जाते़ याच भागातील काही पानठेल्यांवरही दारू आणून दिली जात असल्याचे सायंकाळच्या सुमारास पाहावयास मिळते़ या प्रकारामुळे सायंकाळी या मार्गावर मद्यपिंची गर्दी दिसून येते़ रात्री १०़३० वाजता दुकाने, पानठेले, चहाटपऱ्या, हॉटेल बंद करण्यासाठी सक्ती करणारे पोलीस प्रशासन खुलेआम सुरू असलेल्या दारूविक्रीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़ यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघत आहे़ शहराच्या मध्यवस्तीत तसेच अन्य ठिकाणीही दारूविक्री केली जात असल्याचे निदर्शनास येते़ सामाजिक संघटनांनीही शहरातील दारूविक्रीच्या मुद्यावर गप्प राहणेच पसंत केल्याचे दिसून येते़ पोलीस यंत्रणेने शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता दारूविक्रीवर आळा घालावा आणि विके्रत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(शहर प्रतिनिधी)