शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, गॅस जोडणी असेल तर शिधापत्रिका होईल रद्द ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 13:20 IST

Wardha News शासनाने स्वस्त धान्य दुकांदारांकडे शिधापत्रिका धारकाची माहिती गोळा करण्यासाठी  दुकानदारांकडून ग्राहकांना एक अर्ज देण्यात येत आहे. पण या अर्जात एक मुद्दा असा नमूद केला आहे  की  गॅस जोडणी  आढळल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल,  यामुळे नागरिकांमध्ये  संभ्रम निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देआम्ही जगावे की मरावे, संतप्त नागरिकांचा सवाल

 लोकमत न्यूज नेटवर्क   वर्धा : शासनाने स्वस्त धान्य दुकांदारांकडे शिधापत्रिका धारकाची माहिती गोळा करण्यासाठी  दुकानदारांकडून ग्राहकांना एक अर्ज देण्यात येत आहे. पण या अर्जात एक मुद्दा असा नमूद केला आहे  की  गॅस जोडणी  आढळल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल,  यामुळे नागरिकांमध्ये  संभ्रम निर्माण झाला आहे.          ग्रामीण भागातील  आणि शहरी भागातील सर्वांकडे (अपवाद वगळता)  शिधापत्रिका आहेत आणि घरगुती गॅस सिलेंडर जोडणी देखील आहे. जिल्ह्यातील चिकणी जामणी येथील नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाने आपल्या सुधारित धोरणानुसार प्रत्येक शिधापत्रिका धारकास एका अर्जाद्वारे शिधा पत्रिका धारक व त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संदर्भातील माहिती अर्जाचे माध्यमातून सादर करण्याबाबत कळविले आहे.या अर्जामध्ये अर्जदार त्याच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांची माहिती भरल्यानंतर एक हमीपत्र दिले आहे. हमी पत्रामध्ये मजकूर खालील प्रमाणे नमूद आहे. मी अर्जदार शपथेवर सांगतो की, माझे नावे तसेच माझ्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल याची मला जाणीव आहे. 

नेमके हेच हमीपत्र  गरिबांच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणारे आहे  कारण शिधापत्रिकाधारक असलेल्या अपवाद वगळता सर्वांकडे गॅस जोडणी आहे आणि ती आज काळाची गरज आहे  ग्रामीण भागातही रॉकेल मिळत नाही  सरपन नावाच्या वस्तू आता  शिल्लक राहिलेल्या नाही आणि मुळातूनच  घराघरातून  मातीच्या चुली  स्त्री आरोग्याचा विचार करीत हद्दपार करण्याच्या अनुषंगाने  गरिबांच्या घरी ही गॅस जोडणी देण्याकरता शासनस्तरावरून योजना आखण्यात आल्या  या योजनेचा परिपाक म्हणून आज जवळपास प्रत्येकाच्या घरी गॅस जोडणी आहे  आता या गरीबांना आणि सर्वसामान्य लोकांना शिधापत्रिका ठेवायचे असेल  तर गॅस जोडणी  रद्द करावी लागेल आणि गॅस जोडणी ठेवायचे असेल तर शिधापत्रिका रद्द करावी लागेल  त्यामुळे जगावे कसे?  आणि या बदलत्या धोरणात वागावे कसे? हा गंभीर प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर निर्माण झाला आहे.

 स्वस्त धान्य दुकानात सध्या  ग्राहकांना एक फॉर्म देण्यात येत आहे, त्यामध्ये माहिती भरून दुकानदाराला द्यायचा आहे , फॉर्म च्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे, त्यात ग्राहकाकडे गॅस कनेक्शन असेल तर शिधापत्रिका रद्द होईल, असा उल्लेख केला आहे. असा नियम लागला तर खूप लोकांचे शिधापत्रिका रद्द होऊन गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित राहतील, प्रवीण भोयर चिकणी

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर